कुडाळ : सैनिक स्कूलच्या पात्रता परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांसोबत शिक्षक वृंद. कुडाळ / वार्ताहर : जावली तालुक्यातील पट संख्या आणि गुणवत्तेत अग्रेस
कुडाळ : सैनिक स्कूलच्या पात्रता परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांसोबत शिक्षक वृंद.
कुडाळ / वार्ताहर : जावली तालुक्यातील पट संख्या आणि गुणवत्तेत अग्रेसर असणार्या जिल्हा परिषदेच्या कुडाळ शाळेचे शैक्षणिक कार्य उल्लेखनीय आहे. लॉकडाऊनच्या परिस्थितीत येथील शिक्षकांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून सैनिक स्कूलच्या पात्रता परीक्षेत शाळेचे आठ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.
सन 2021-22 मध्ये झालेल्या सैनिक स्कूलच्या प्रवेश परीक्षेमध्ये श्रेयस जमदाडे, ओमराजे गायकवाड, श्रीनाथ रासकर, स्वराज पवार, वैदवी रासकर, अनुष्का शेवते, श्रावणी साळुंखे, आर्यवीर पवार यांनी पात्रता परीक्षेत यश संपादन केले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर यश मिळवणारी जिल्हा परिषदेची जावली तालुक्यातील कुडाळ ही एकमेव शाळा आहे.
या विद्यार्थ्यांना वर्ग शिक्षिका मेघा चव्हाण, जोत्स्ना वायदंडे यांनी मार्गदर्शन केले. शाळेच्या उज्ज्वल यशाबद्दल नवी मुंबई महानगरपालिका शिक्षणाधिकारी अरुणा यादव, गटशिक्षणाधिकारी कल्पना तोडरमल, विस्तार अधिकारी चंद्रकांत कर्णे, केंद्र प्रमुख अरविंद दळवी, मुख्याध्यापिका जयश्री गायकवाड, सर्व शिक्षक वृंद, ग्रामस्थ, पालक यांनी अभिनंदन केले.
COMMENTS