Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लाचारी चळवळीला संपवण्याचा प्रयत्न- प्रकाश आंबेडकर  

मुंबई प्रतिनिधी - वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला असून कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. सोशल मीडिया प

‘वंचित’चा ‘मविआ’सोबत अधिकृत काडीमोड
मविआ-वंचितची बोलणी फिस्कटली ?
ओबीसी आरक्षणाचे ताट वेगळेच हवे

मुंबई प्रतिनिधी – वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला असून कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आंबेडकर यांनी मोठा निर्णय घेणार असल्याचे संकेत दिले आहेत. महाविकास आघाडीत सहभागी होण्याच्या संदर्भात आंबेडकर मोठा निर्णय घेऊ शकतात. प्रकाश आंबेडकर म्हणालेत की, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि हितचिंतक यांनी युतीच्या संदर्भात सल्ला दिला. त्यांचा मी आभारी आहे. माझ्या आजोबांनी चालवलेली चळवळ लाचारीच्या विरोधातील होती, मीही लाचारी मान्य करणार नाही. युतीमध्ये अडचण येऊ नये म्हणून व्यक्तिगत हेवेदावे येऊ दिले नाहीत. पण, जेथे चळवळीलाच लाचार केले जात आहे, लाचार करुन संपवलं जात आहे हे कधीही सहन करणार नाही. शाहु-फुले-आंबेडकरी मतदारांना माझे आवाहन आहे. आपल्यामध्ये जिंकलो पाहिजे ही भावना आहे. पण, काही गोष्टी बोलू शकत नाही. पण अनेक ठिकाणी आपण जिंकू अशी परिस्थिती आहे. चळवळीचा विचार जास्त महत्त्वाचा आहे.व्यक्तिगत विचार हा व्यक्तीपर्यंत मर्यादीत राहतो. आपण सार्वजनिक जिवनात राहतो. त्यामुळे सार्वजनिक आणि सार्वत्रिक जो निर्णय घेतला जातो त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी जो निर्णय घेईल त्याला शाहू-फुले-आंबेडकरी जनतेचा पूर्ण पाठिंबा आहे असं मी गृहित धरतो, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

COMMENTS