Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘जलपर्णी’ मुक्त गोदावरी ठेवण्यासाठी प्रयत्न करावे – विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

गोदावरी प्रदूषण नियंत्रण समितीच्या बैठक संपन्न

नाशिक - दूषित पाण्यामुळे जलपर्णी फोफावते. जलपर्णीच्या संकटाने नद्या प्रदूषित होत आहेत. जलपर्णी असेल तर नदीचा प्रवाह खुंटतो. हवेतील ऑक्सिजन पाण्या

75 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले ध्वजारोहण
महाराष्ट्र दिनानिमित्त विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न
जिल्हाधिकारी कार्यालयात कुंभमेळा कक्ष स्थापन करावा :- राधाकृष्ण गमे

नाशिक – दूषित पाण्यामुळे जलपर्णी फोफावते. जलपर्णीच्या संकटाने नद्या प्रदूषित होत आहेत. जलपर्णी असेल तर नदीचा प्रवाह खुंटतो. हवेतील ऑक्सिजन पाण्यात मिसळण्याची क्रिया मंदावते. शहराच्या व कारखान्याच्या सांडपाण्यातील व मलजल पाण्यातील दूषित घटक मिसळले की जलपर्णी वाढते. दूषित घटक पाण्यात मिसळणे जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत जलपर्णीची वाढ अनिर्बंधपणे होत राहील. या जलपर्णीमुळे नदीची नेसर्गिक पर्यावरणीय व्यवस्थाही धोक्यात येत आहे. त्यामुळे गोदावरीला जलपर्णी मुक्त करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिल्या.

गोदावरी प्रदूषण नियंत्रण समितीची आढावा बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात घेण्यात आली. त्यावेळी विभागीय आयुक्त श्री.गमे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन.डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, उपायुक्त (करमणुक शुल्क) राणी ताटे, उपायुक्त मनपा अर्चना तांबे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी अमर दुर्गळ, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे,  उपसंचालक (माहिती) ज्ञानेश्वर इगवे, याचिकाकर्ते निशीकांत पगारे, राजेश पंडीत आदी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले की, रामकुंडावरील क्राँक्रीटीकरण थांबविण्यात आले असून महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त या संयुक्त बैठक घेऊन यावर उपायायोजना सुचवाव्यात. तसेच कुठलेही सांडपाणी नदीमध्ये जाणार नाही यासाठी सर्व यंत्रणांनी दक्ष राहून काम करावे,  

बैठकीत यावेळी  औद्योगिक क्षेत्रात काम करतांना पर्यावरणाचे नुकसान होणार नाही किंवा प्रदूषण टाळून उद्योग चालविणाऱ्या शामला इलेक्ट्रा प्लाटर्स व एबीबी या औद्योगिक संस्थांचा सत्कार यावेळी श्री गमे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच  शासकीय नोकरी करुन पर्यावरण व विजेची बचत करा असा संदेश आपल्या पाठीला लावून जनजागृती करणारे महावितरणचे कर्मचारी श्री योगेश बर्वे यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.

                                         

COMMENTS