Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विधानसभेत कसर व्याजासह भरून काढू : फडणवीस

मुंबई ः भाजप पुन्हा सत्तेत आल्यास संविधान बदलणार असा खोटा प्रचार करुन जागा जिंकण्याचा प्रयत्न झाला, हे या निकालाचे दुर्दैव असल्याचे मत उपमुख्यमंत

Nawab Malik Live: अंडरवर्ल्डशी संबंध? मलिक म्हणतात ‘आ रहा हूँ मै’ | (Full Video)
फडणवीसांचं वय पाहू नका… १०० अजित पवार ते खिशात घालून फिरतात…
गोपीचंद पडळकरांचे वक्तव्य अशोभनीय ः फडणवीस

मुंबई ः भाजप पुन्हा सत्तेत आल्यास संविधान बदलणार असा खोटा प्रचार करुन जागा जिंकण्याचा प्रयत्न झाला, हे या निकालाचे दुर्दैव असल्याचे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. मात्र, निवडणुकीत जनतेचा जनादेश जसा असतो, तसाच स्वीकारायचा असतो. तो शिरसावंद्य मानायचा असतो. या निकालाचे सखोल चिंतन करुन विधानसभेत पुन्हा जनतेत जाऊन, या लोकसभेची कसर व्याजासह भरून काढू, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पोस्टच्या माध्यमातून पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पुन्हा एकदा देशातील जनतेने एनडीएला संपूर्ण बहुमत प्रदान केले आणि मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सलग तिसर्यांदा भारताचे पंतप्रधान होणार आहेत. मी त्यांचे आणि देशभरातील सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो ! इंडिया आघाडीतील सर्व पक्ष मिळून जितक्या जागांवर आघाडीवर आहेत, त्यापेक्षा अधिक जागा एकट्या भाजपाच्या वाट्याला आल्या आहेत. शिवाय, आंध्रप्रदेशात तेलगू देसम पार्टीच्या नेतृत्त्वात भाजपा युतीला, तर ओडिशात भाजपाच्या नेतृत्त्वात दणदणीत यश मिळाले, या दोन्ही राज्यातील कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो.

COMMENTS