बीड प्रतिनिधी - सन 2023 च्या पावसाळ्यात वृक्ष लागवड करण्यासाठी रोपांची सहज उपलब्धता व्हावी यासाठी हर घर नर्सरी हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचे
बीड प्रतिनिधी – सन 2023 च्या पावसाळ्यात वृक्ष लागवड करण्यासाठी रोपांची सहज उपलब्धता व्हावी यासाठी हर घर नर्सरी हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ- मुंडे यांनी केले आहे.
हर घर नर्सरी उपक्रमातून प्रत्येक गावात प्रत्येक कुटुंबाने किमान 50 रोपे तयार करावयाची आहेत. या माध्यमातून लोकसहभाग वाढावा हा या उपक्रमाचा हेतू असून वृक्षलागवड अभियानाला व्यापक स्वरूप प्राप्त होऊ शकेल. हर घर नर्सरी उपक्रमात लोकसहभाग वाढविण्यासाठी शासकीय यंत्रणा काम करत आहेत. या उपक्रमात शासकीय कर्मचारी,अधिकारी यांनीही कृतीशील सहभाग नोंदवणे आवश्यक आहे. सामाजिक दायित्व म्हणून शासकीय कर्मचारी/अधिकारी यांनी नर्सरी तयार करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या आहेत. प्रत्येक शासकीय कार्यालयात 5 हजार रोपांची नर्सरी तयार करावी. स्थानिक प्रजातींची जास्तीत जास्त लागवड होईल याकरिता अशा रोपांची प्राधान्याने निर्मिती करावी. हर घर नर्सरी,वृक्ष लागवडीसारखे उपक्रम हे पर्यावरण संवर्धनाचे व दुरगामी परिणाम करणारे आहेत. किंबहुना असे उपक्रम मानवजातीच्या अस्तित्वासाठी आवश्यक आहे. हर घर नर्सरी उपक्रम यशस्वी होण्यासाठी गाव पातळीपासून शहरी भागापर्यंत जनजागृती करावी. जेणेकरून प्रत्येक कुटुंबाने 50 रोपे तयार करण्यास प्रेरणा द्यावी. 2023 च्या पावसाळ्यात वृक्षलागवड करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रोपांची स्थानिक पातळीवर सहज उपलब्धता होऊन, पर्यावरण संवर्धन व वृक्षलागवड याबाबत चांगला संदेश जाईल, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
COMMENTS