पाटण / प्रतिनिधी : कराड तालुका शिक्षण विभागातील शिक्षण विस्तार अधिकारी जमीला उस्मान मुलाणी यांना कोयना एज्युकेशन सोसायटी व माजी विद्यार्थी संघ,

पाटण / प्रतिनिधी : कराड तालुका शिक्षण विभागातील शिक्षण विस्तार अधिकारी जमीला उस्मान मुलाणी यांना कोयना एज्युकेशन सोसायटी व माजी विद्यार्थी संघ, पाटणतर्फे दिला जाणारा ’कोयना रत्न’ पुरस्कार बाळासाहेब देसाई कॉलेज, पाटण येथे माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्यात प्रदान करण्यात आला. आई-वडिलांचे संस्कार व शाळेने दिलेली ज्ञानाची शिदोरी यामुळेच जीवनात उत्तुंग यश प्राप्त करता आले. शाळा माऊलीच्या ऋणातच सदैव राहून शाळा माऊलीच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहीन असे सत्कारास उत्तर देताना त्यांनी प्रतिपादन केले. प्रसंगी अनेक माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा देणारी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास जमीला मुलाणी त्यांचे वडील माजी मुख्याध्यापक उस्मान मुलाणी, आई माजी मुख्याध्यापक मदिना मुलाणी, प्राचार्य डॉ. शिरीषकुमार पवार, डॉ. हेमलता काटे, प्रा. डॉ. विलासराव कळंत्रे, प्रा. डॉ. पांडुरंग ऐवळे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष अॅड. बाबुराव शेळके व अनेक हितचिंतक उपस्थित होते.
COMMENTS