Homeताज्या बातम्यादेश

केजरीवालांच्या पीएला ईडीचे समन्स

उत्पादन शुल्क घोटाळ्यात होणार चौकशी

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः दिल्लीतील कथित उत्पादन शुल्क घोटाळा चांगलाच गाजतांना दिसून येत आहे. आप पक्षाचे नेते मनिष सिसोदिया तसेच दिल्लीचे मुख्यमंत्र

श्रमाचे सौंदर्यशास्त्र गाणारा कवी ! 
ग्रीसमध्ये खडकावर बोट आदळल्याने मोठी दुर्घटना
 मी पूर्ण कपड्यात फिरते बाकीच्यांचे मला माहित नाही  – शर्मिला ठाकरे

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः दिल्लीतील कथित उत्पादन शुल्क घोटाळा चांगलाच गाजतांना दिसून येत आहे. आप पक्षाचे नेते मनिष सिसोदिया तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची कथित उत्पादन शुल्क धोरण घोटाळ्याप्रकरणी वेगवेगळ्या माध्यमातून चौकशी सुरू असतांनाच, आता अरविंद केजरिवाल यांच्या स्वीय सहायकाला अंमलबजावणी संचालनालयाने समन्स बजावले आहे. त्यामुळे केजरीवाल यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
ईडीने अरविंद केजरीवाल यांच्या स्वीय सहायकाला समन्स बजावले आहे. ईडकडून कथित उत्पादन शुल्क घोटाळ्याबाबत चौकशी केली जाणार आहे. ईडीच्या या निर्णयानंतर आप पक्षाकडून मोदी सरकारवर टीका केली जात आहे. याआधी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीबीआयने मनिष सिसोदिया यांना समन्स बजावले होते. याबाबत मनिष सिसोदिया यांनी स्वत: ट्वीट करून याबाबत माहिती दिली होती. विशेष म्हणजे सीबीआयने यापूर्वी सिसोदिया यांची 14 तास चौकशी केली होती. तसेच त्यांच्या घरी आणि कार्यालयावरही छापे टाकले होते. गेल्यावर्षी 17 नोव्हेंबरला दिल्ली सरकारने नवीन उत्पादन शुल्क धोरण लागू केले होते. या धोरणामुळे कोट्यावधी रुपयांची उलाढाल होईल आणि मद्य माफियांवर अंकुश बसेल, असा विश्‍वास दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी व्यक्त केला होता. 

COMMENTS