Homeताज्या बातम्यादेश

सोरोसशी संबंधित संस्थावर ईडीचे छापे

नवी दिल्ली : भारताच्या विरोधात कुरापती करणारा अमेरिकन उद्योगपती जॉर्ज सोरोस याच्याशी संबंधित संस्थांवर मंगळवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापे

‘अग्निपथ’च्या नावाखाली देशातील करोडो तरुणांची क्रूर थट्टा : नाना पटोले
‘शरद पवार पावसात भिजले, पण भाजपला न्युमोनिया झालाय’ l LOKNews24
वाशी विभागात मागील दोन दिवसांपासून पाणी नसल्यामुळे नागरींकांचे प्रचंड हाल

नवी दिल्ली : भारताच्या विरोधात कुरापती करणारा अमेरिकन उद्योगपती जॉर्ज सोरोस याच्याशी संबंधित संस्थांवर मंगळवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापे टाकले. ओपन सोसायटी फाऊंडेशन (ओएसएफ) आणि इतर काही कंपन्यांवर ही छापेमारी करण्यात आली. परकीय चलन व्यवस्थापन कायद्याच्या (फेमा) उल्लंघन प्रकरणी ही कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ओएसएफ ही जॉर्ज सोरोस यांच्या आर्थिक सहायाने चालणारी संस्था आहे. ओएसएफने अनेक संस्थांना निधी दिला आणि या निधीचा वापर फेमा कायद्याच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करतो. अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या माजी कर्मचार्‍यांच्या ठिकाणांवर ही छापेमारी करण्यात आली आहे. डिसेंबर 2020 मध्ये अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलला भारतात काम करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

COMMENTS