मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स गु्रपशी संबंधित 35 हून अधिक ठिकाणी गुरूवारी सकाळी अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने छापे

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स गु्रपशी संबंधित 35 हून अधिक ठिकाणी गुरूवारी सकाळी अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने छापे टाकले. अंबांनीच्या 50 कंपन्यांवर छापे टाकत ईडीकडून तपास करण्यात येत आहे. येस बँकेतून झालेल्या तीन हजार कोटी रूपयांच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी हा छापा टाकण्यात आला आहे.
सीबीआयने नोंदवलेल्या दोन एफआयआर आणि सेबी, नॅशनल हाऊसिंग बँक, बँक ऑफ बडोदा आणि नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग अथॉरिटी (एनएफआरए) सारख्या एजन्सींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. हे प्रकरण 2017 ते 2019 दरम्यान अनिल अंबानींशी संबंधित रिलायन्स ग्रुप कंपन्यांना येस बँकेने दिलेल्या सुमारे 3,000 कोटी रुपयांच्या कर्जाशी संबंधित आहे. ईडीच्या सुरुवातीच्या तपासात असे दिसून आले आहे की ही कर्जे बनावट कंपन्या आणि ग्रुपच्या इतर युनिट्सकडे वळवण्यात आली होती.

COMMENTS