Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ईडीचे महाराष्ट्र-गुजरातमध्ये 24 ठिकाणी छापे

मुंबई :अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने गुरूवारी महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात अनेक ठिकाणी छापे टाकत झाडाझडती घेतली.ईडीने महाराष्ट्रातील मालेगाव

चिखलदर्‍यात कार दरीत कोसळून चौघांचा मृत्यू
निर्णयाचा पाठपुरावा केल्यास यशोशिखर गाठता येते – मंगेश चिवटे
उत्तरप्रदेशमध्ये बॉम्ब बनवतांना स्फोट

मुंबई :अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने गुरूवारी महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात अनेक ठिकाणी छापे टाकत झाडाझडती घेतली.ईडीने महाराष्ट्रातील मालेगावमध्ये एका व्यावसायिकाविरूद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणात देखील छापे टाकले. या व्यावसायिकाने निवडणुकीतील गैरप्रकारांसाठी पैशांचा गैरवापर केल्याचा संशय आहे. या प्रकरणात बँक खाती आणि 125 कोटी रुपयांचा गैरवापर वापर केल्याचा आरोप आहे.
ईडीने या छाप्यासंदर्भात अधिक माहिती देतांना सांगितले की, मालेगावातील व्यावसायिकाने अनेक लोकांच्या बँक खात्यांचा गैरवापर करून 125 कोटींहून अधिकचे व्यवहार केले आहेत. पीएमएलए अंतर्गत करण्यात येत असलेल्या या कारवाईत महाराष्ट्रातील मालेगाव, नाशिक आणि मुंबई आणि गुजरातमधील अहमदाबाद-सुरत अशा एकूण 23 परिसरांची झडती घेण्यात येत आहे. छाप्यांमध्ये महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, ओडिशा आणि पश्‍चिम बंगालमधील 2,500 हून अधिक व्यवहार आणि सुमारे 170 बँक शाखांची चौकशी सुरू आहे. या खात्यांमधून पैसे एकतर जमा किंवा काढले गेले आहेत. हे प्रकरण गेल्या आठवड्यात मालेगाव पोलिसात व्यापारी सिराज अहमद हारुण मेमन यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या एफआयआरशी संबंधित आहे. तक्रारदार ही व्यक्ती आहे ज्याच्या बँक खात्यातून अवैध व्यवहार झाले. निवडणूक निधीसाठी बँक खात्याचा वापर झाल्याचा अंदाज आहे.

निवडणुकीसाठी 125 कोटी आल्याचा सोमय्यांचा आरोप
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी 12 नोव्हेंबर रोजी राज्यात सुमारे 125 कोटी रुपयांची बेनामी हस्तांतरण झाल्याचे सांगून खळबळ उडवून दिली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणावर बेनामी व्यवहार नोव्हेंबरच्या सुरुवातीला अवघ्या 4 दिवसांत झाले. मालेगावमध्ये मोठ्या प्रमाणात व्होट जिहाद सुरू असल्याचे सोमय्या म्हणाले होते.

COMMENTS