Homeताज्या बातम्यादेश

आप खासदाराच्या घरावर ईडीचा छापा

नवी दिल्ली ः आपचे राज्यसभा खासदार संजीव अरोरा यांच्या लुधियाना येथील घरावर ईडीने सोमवारी छापा टाकला. याशिवाय फायनान्सर हेमंत सूदच्या घरावरही ईडीन

काँग्रेस सेवा दलाचे तालुकाध्यक्ष रमेश जाधव यांचे निधन
वाचन संस्कृतीतर्फे प्रा. विलासराव तुळे यांचा सन्मान
इस्त्रोने अंतराळात केले यशस्वी डॉकिंग

नवी दिल्ली ः आपचे राज्यसभा खासदार संजीव अरोरा यांच्या लुधियाना येथील घरावर ईडीने सोमवारी छापा टाकला. याशिवाय फायनान्सर हेमंत सूदच्या घरावरही ईडीने छापे टाकले आहेत. मनी लॉड्रिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, आम्ही झुकणार नाही, अशी माहिती आपचे नेते मनीष सिसोदिया यांनी ट्विट करत दिली आहे. ईडीच्या पथकांनी सकाळी संजीव अरोरा यांच्या घरासह त्यांच्या काही जवळच्या व्यावसायिक भागीदारांवर छापे टाकले. हेमंत सूद हे माजी कॅबिनेट मंत्री भारतभूषण आशू यांचे निकटवर्तीय आहेत. धान्य वाहतूक प्रकरणात भारतभूषण यांचे नाव पुढे आल्यानंतर केलेल्या तपासात आता हेमंत सूदवर कारवाई करण्यात आली आहे.

COMMENTS