ईडीने केली 25 कोटींची मालमत्ता जप्त

Homeताज्या बातम्यादेश

ईडीने केली 25 कोटींची मालमत्ता जप्त

कोळसा घोटाळा प्रकरणी पश्‍चिम बंगालमध्ये कारवाई

कोलकाता : पश्‍चिम बंगालमधील बहुचर्चित कोळसा घोटाळा प्रकरणी ईडीनं कारवाई केली आहे. याप्रकरणातील मुख्य आरोपी अनुप मांझीच्या दोन साथीदारांची सुमारे 25 क

दारू पिण्याचा दिलेला सल्ला अखेर डॉक्टरला भोवला ; शासनाने केले कार्यमुक्त
मीरा भाईंदरचे आयुक्त ईडीच्या रडारवर
सर्वोच्च न्यायालयाचे दोन निर्णय आणि टायमिंग ! 

कोलकाता : पश्‍चिम बंगालमधील बहुचर्चित कोळसा घोटाळा प्रकरणी ईडीनं कारवाई केली आहे. याप्रकरणातील मुख्य आरोपी अनुप मांझीच्या दोन साथीदारांची सुमारे 25 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, या दोन साथीदारांची नावे जयदेव मंडल आणि गुरुपाद मांझी अशी आहेत. ईडीच्या वरिष्ठ अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, मनी लांड्रिंग कायद्यांतर्गत सीबीआयनं 27 नोव्हेंबर 2022 रोजी नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे या लोकांविरोधात एफाआयआर दाखल केला होता. त्यानुसार तपास सुरू झाला होता. दरम्यान, गुरुपाद मांझी यानं गुन्ह्यातून कमावलेले 89 कोटींहून अधिक रुपये आणि जयदेव मंडल यानं 2017 ते 2020 दरम्यान अनुप माजीच्या लोकांना 58 कोटींहून अधिक रक्कम दिली असल्याची माहिती ईडी चौकशीतून समोर आली आहे. या करावाईत ईडीने या दोन आरोपींच्या 25 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या जंगम स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत. यापूर्वी या प्रकरणी ईडीने 56 ठिकाणी छापे टाकले होते. यासोबतच 181 कोटी रुपयांहून अधिक किमतीची जंगम स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

COMMENTS