Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हा बँक संचालक निवडणूकीच्या पार्श्‍वभूमिवर खा. शरद पवार सातारा दौर्‍यावर

सातारा / प्रतिनिधी : जिल्हा बँकेसह आगामी पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यांना

दुचाकीच्या इंजिनचा वापर करत बनवली शेतीपूरक चारचाकी गाडी
शेतकरी कार्डधारकांना पैसे देण्यात अडचणींचा डोंगर
लातूर जिल्ह्यात एक रुपया विमा हप्ता भरुन पाच लाख शेतकर्‍यांनी काढला पीक विमा!

सातारा / प्रतिनिधी : जिल्हा बँकेसह आगामी पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यांना चार्ज करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार रविवार, दि. 31 रोजी सातारा जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत आहेत. दौर्‍यादरम्यान ते सातारा आणि सांगली जिल्हा बँकेच्या निवडणूकीबाबत सखोल नियोजन करण्याच्या तयाारीत आहेत. त्यामध्ये बहुचर्चित्र सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकीत राष्ट्रवादी अंतर्गत निर्माण झालेल्या वादावर पडदा टाकून सर्वसमावेशक पॅनेल बनविणार असल्याचे समजते. त्यांचा दौरा आगामी निवडणुकांची रणनीती ठरविणार आहे. त्यामुळे त्यांच्या दौर्‍याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
सातारा जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पडझड झाली. त्यानंतर कोरोनाचे संकट निर्माण झाल्याने तब्बल दीड वर्षे लॉकडाऊनमध्ये गेले. आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने सर्व व्यवहार सुरळीत होवू लागले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची सातारा जिल्ह्यातील विस्कटलेली घडी पुन्हा पुर्ववत बसविण्याची गरज आहे. आगामी काळात होणार्‍या पालिका, नगरपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषदेसह सहकारी संस्थांच्या निवडणुकाही पक्षासाठी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना चार्ज करण्यासाठी व जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील पॅनेलचा तिढा सोडविण्यासाठी शरद पवार येत्या रविवारी सातारा दौर्‍यावर येत आहेत. दौर्‍यादरम्यान ते राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकारी व आमदार, खासदारांसोबत बैठक घेऊन चर्चा करतील. बैठकीनंतर जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियममध्ये आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सहकार व पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आ. मकरंद पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. सभेमध्ये खा. शरद पवार आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना कानमंत्र देणार आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती, पालिका, नगरपंचायत निवडणुकीसाठी पक्षाची रणनीती ठरविणार आहेत. खा. पवार यांच्या या दौर्‍यातून कार्यकर्त्यांना चार्ज केले जाणार आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत निर्माण झालेला राष्ट्रवादीअंतर्गत नेत्यांचा नाराजीचा तिढाही ते सोडविणार आहेत. कदाचित सर्वसमावेशक पॅनेलचे अंतिम उमेदवार तेच ठरवून जातील.

COMMENTS