Homeताज्या बातम्यादेश

कॅनडियन नागरिकांसाठी ई-व्हिसा सेवा सुरू

दोन महिन्यानंतर भारत सरकारकडून व्हिसा सेवा पूर्ववत

नवी दिल्ली ः भारत-कॅनडाचे संबंध पुन्हा पूर्ववत होतांना दिसून येत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून भारत सरकारने कॅनेडियन नागरिकांसाठी बंद केलेली ई-व्

सटाणा ट्रामा केअर व डांगसौंदाणे ग्रामीण रुग्णालयास मिळणार नवीन रुग्णवाहिका
औरंगाबादमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली हाय प्रोफाइल कुंटणखाना | LOKNews24
विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीची दोरी राज्यपालांच्या हाती

नवी दिल्ली ः भारत-कॅनडाचे संबंध पुन्हा पूर्ववत होतांना दिसून येत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून भारत सरकारने कॅनेडियन नागरिकांसाठी बंद केलेली ई-व्हिसा सेवा पुन्हा बुधवारी सुरू केली आहे. त्यामुळे दोन्ही देशांचे संबंध पुन्हा एकदा पूर्ववत होतांना दिसून येत आहे. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी केल्यानंतर दोन्ही देशांच्या संबंधात तणाव निर्माण झाला होता. या वादातून भारताने 21 सप्टेंबरपासून कॅनडियन नागरिकांसाठी व्हिसा सेवा निलंबित केल्या होत्या.

कॅनडातील उच्चायुक्तालय आणि वाणिज्य दूतावासांना ‘सुरक्षाविषयक धोका’ असल्यामुळे कॅनडाच्या नागरिकांना भारताचा व्हिसा देणे तात्पुरते स्थगित करण्यात येत असल्याचे परराष्ट्र खात्याने 21 सप्टेंबर रोजी जाहीर केले होते. कॅनडातील भारतीय उच्चायुक्तालय कार्यालयाच्या संकेतस्थळावरही याबाबतची माहिती देण्यात आली होती. याच्या एक दिवस आधी म्हणजेच 20 सप्टेंबर रोजी भारताने कॅनडात वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांना सावधगिरी बाळगण्यास सांगितले होते. भारतविरोधी वाढत्या कारवाया, तसेच राजनैतिक तणाव लक्षात घेता भारताने हा इशारा दिला होता. त्यानंतर कॅनेडियन नागरिकांसाठी व्हिसा देणे बंद केले होते. परंतु, तब्बल दोन महिन्यानंतर भारताने कॅनेडियन नागरिकांसाठी इलेक्ट्रॉनिक व्हिसा सेवा सुरू केली आहे. ई-व्हिसा पुन्हा सुरू केल्याचा अर्थ आहे की, मेडिकल व्हिसा, बिझनेस व्हिसा आणि टूरिस्ट व्हिसा यासह चार प्रकारचे व्हिसा सामील आहेत. सप्टेंबर महिन्यात भारताने या व्हिसावर पुढील आदेशापर्यंत बंदी घातली होती. याबाबत दोन्ही देशांनी आपल्या नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. कॅनडाने आपल्या नागरिकांना म्हटले होते की, दोन्ही देशातील संबंध बिघडल्याने नागरिकांनी भारतात प्रवास करताना सावधताना बाळगावी.

दोन्ही देशाचे पंतप्रधान भेटणार – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो जी-20 च्या व्हर्चुअल मीटिंगमध्ये भेटणाऱ असल्याच्या पार्श्‍वभूमीवर भारताने दोन्ही देशांमधील व्हिसा सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही देशांच्या पंतप्रधान भेटीच्या आधी भारताच्या या निर्णयाने दोन्ही देशादरम्यानचे संबंध पूर्ववत करण्याच्या दिशेने सकारात्मक पाऊल टाकले आहे. कॅनडियन पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी आरोप लावला होता की, जून महिन्यात कॅनडाचा नागरिक खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येत भारत सरकारच्या एजेंटचा हात होता. भारताने या आरोपाचे खंडन करत म्हटले की, हे आरोप बुनबुडाचे आहेत. याबाबत पुरावे सादर करण्याची मागणी भारताने केली. मात्र कॅनडाने याबाबत कोणतेही पुरावे अजूनपर्यंत भारताकडे सादर केलेले नाहीत.

COMMENTS