Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दुर्गा भवानी ज्योतींचे नेवासा शहरात उत्स्फूर्त स्वागत

नेवासाफाटा ः नेवासा येथील दुर्गादेवी तरुण मंडळाच्या वतीने मोहटादेवी गडावरून आणलेल्या दुर्गाभवानी ज्योतीचे नेवासा नगरीत भाविक व सुवासिनींनी पंचारत

‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेत सुरु होणार नवा अध्याय | Filmi Masala | LokNews24
काल्याच्या कीर्तनाने वीरभद्र महाराज यात्रेची सांगता
जल आत्मनिर्भरतेवरच गावाचे उज्वल भविष्य ः जिल्हाधिकारी सालीमठ

नेवासाफाटा ः नेवासा येथील दुर्गादेवी तरुण मंडळाच्या वतीने मोहटादेवी गडावरून आणलेल्या दुर्गाभवानी ज्योतीचे नेवासा नगरीत भाविक व सुवासिनींनी पंचारती ओवाळून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. तर नेवासा शहर व परिसरात उत्साहपूर्ण वातावरणात घटस्थापना करण्यात आली. दुर्गाभवानी ज्योतीचे नेवासा शहरात आगमन झाल्यानंतर मार्केट कमिटी परिसर व मध्यमेश्‍वरनगर परिसरातील महिलांनी देवी भक्तांचे पाद्य पूजन करून तर भाविकांनी फटाक्यांची आतषबाजी करत स्वागत केले.
नेवासा शहरात सदरची ज्योत आल्यानंतर श्री मळगंगा देवी मंदिरामध्ये जाऊन सर्व देविभक्तांनी दर्शन घेतले, तर नेवासा शहरातील दुर्गादेवी  मंदिरात ज्योती आल्यानंतर सुवासिनीनी पंचारती ओवाळून देवी भक्तांचे औक्षण करून पंचारतीद्वारे पूजन करण्यात आले. यावेळी मोहटादेवी गडावरून आणलेल्या दुर्गाभवानी ज्योत यात्रेमध्ये नेवासा शहरातील विविध तरुण मंडळांनी सहभाग नोंदवला ढोलताशांच्या गजरात आई जगदंबेच्या नावाने जयघोष करत शेकडो देविभक्तांनी मोहटादेवी गडावरून आणलेल्या ज्योती दुर्गादेवी मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. नवरात्रोत्सवानिमित्त नेवासा शहर व परिसरातील वातावरण दुर्गामय बनले होते. रविवारचा बाजार व नवरात्र उत्सव यामुळे घटस्थापनेचे विविध साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठ फुलली होती. नागरिकांच्या चेहर्‍यावर उत्साह दिसत होता नेवासा शहर व परिसरात उत्साहपूर्ण वातावरणात घटस्थापना करण्यात आली.

COMMENTS