Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माण तालुक्यात अवकाळीमुळे द्राक्षबागांचे मोठे नुकसान

गोंदवले / वार्ताहर : माण तालुक्यात पावसाने अन् शेतकर्‍यांनी मोठ्या कष्टाने फुलवलेल्या शेतशिवारावर स्मानी संकटा कहर केला आहे. हातातोंडाशी आलेल्या

सोमवारी जनार्दन स्वामी हॉस्पिटलमध्ये सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन
कोयनेत गढूळ पाणी पुरवठा; प्रकल्पावर महिलांचा हंडा मोर्चा
 निफाडच्या उगावमध्ये पावसाने 2 एकर द्राक्षबाग जमीनदोस्त  

गोंदवले / वार्ताहर : माण तालुक्यात पावसाने अन् शेतकर्‍यांनी मोठ्या कष्टाने फुलवलेल्या शेतशिवारावर स्मानी संकटा कहर केला आहे. हातातोंडाशी आलेल्या द्राक्ष बागांचे डोळ्यांदेखत नुकसान होताना पाहण्याचे दुर्भाग्य शेतकर्‍यांच्या नशिबी आले आहे. पावसाच्या रिपरिपमुळे द्राक्षाच्या मन्याला क्रकिंग होऊन देवापूर, पलसावडे, काळचौंडी, जांभुळणी ढोकमोडा, हिंगणी, विरळी व कूकुडवाड परिसरात झालेले नुकसान शेतकरी बांधवांना खाईत लोटणारे ठरले.
सोसायटीच्या माध्यमातून लाखो रुपयांची कर्जे घेऊन, प्रसंगी सोने गहाण ठेऊन द्राक्ष बागा फुलवल्या होत्या. हेच हिरवे सोने द्राक्ष शेतकरी बांधवांना जगण्याच्या आशेचा किरण ठरणार असताना पावसामुळे होत्याचे नव्हते झाले आहे. कोट्यवधीचे नुकसान शेतकर्‍यांसाठी डोकेदुखी ठरत असून बळीराजा अस्मानी व सुलतानी अशा दोन्ही संकटांना बळी पडत आहे. एकीकडे राज्य शासन फळबागा करण्याचे आवाहन करते. मात्र, दुसरीकडे निसर्ग साथ देत नाही. अशात दुष्काळी पट्ट्यातील फळबाग लागवड करणार्‍या शेतकर्‍यांनी नक्क्ी करायचे काय? तूटपुंज्या रकमेवर शासनाची मदत खरंच या शेतकर्‍यांना ऊर्जितावस्था आणून देईल का? हा यक्ष प्रश्‍न असला तरी फळ बाग व्यवसायाला शासनाच्या मदतीने चालना मिळण्याची गरज निर्माण झाली आहे. शासनाने द्राक्ष बागांचे तत्काळ पंचनामे करून तूटपुंजी मदत न देता भरघोस मदत देऊन शेतकर्‍यांना ऊर्जितावस्था आणण्याची गरज निर्माण झाली आहे, जिल्हाधिकारी यांनी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकरी करत आहेत. दरम्यान, प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी नुकसानीची पाहणी करून तातडीने पंचमामे करण्याच्या सूचना दिल्या.

COMMENTS