Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पावसामुळे उत्पादन घटल्याने झेंडू शंभरी पार

सातारा / प्रतिनिधी : गणेशोत्सवापूर्वी गडगडलेला झेंडूचा दर गणेशोत्सवात मात्र घाऊक बाजारात शंभरी पार झाला आहे. दरवाढीमुळे शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर

हिंगोलीतील शेतकर्‍याची गळफास घेवून आत्महत्या
 साऊथ सुपरस्टार महेश बाबू पोरका झाला
शिवसेनेच्या 16 बंडखोरांना अपात्रतेची नोटीस | DAINIK LOKMNTHAN

सातारा / प्रतिनिधी : गणेशोत्सवापूर्वी गडगडलेला झेंडूचा दर गणेशोत्सवात मात्र घाऊक बाजारात शंभरी पार झाला आहे. दरवाढीमुळे शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर आनंद फुलला आहे. ‘गोल्डन यलो’ आणि ‘गोल्डन ऑरेंज’ जातीची झेंडूची फुले ही किरकोळ बाजारात गणेशोत्सवात 300 रुपये किलो दराने विकली गेली. यंदा सतत पाऊस असल्याने झेंडूची लागवड कमी झाली आहे. सततच्या पाऊस व ढगाळ हवामानामुळे झेंडू खराब झाला आहे.

सध्या बाजारात लाल पिवळ्या रंगांची झेंडूची फुले आहेत. यामध्ये लाल-केशरी रंगात ऑरेंज, कलकत्ता, जंबो आदी जाती आहेत. तसेच पिवळ्या रंगात ‘स्मार्ट यलो’, कांचन, श्रावणी जातीची फुले विक्रीसाठी आली आहेत. पिवळ्या झेंडूचा दर शंभर रुपये किलोपर्यंत पोहचला आहे. मागणी अधिक असल्याने केशरी रंगाच्या झेंडूचा दर किलोला शंभरी पार करत सव्वाशे झाला आहे. शेवंतीच्या फुलाचीही आवक आहे. शेवंतीचा दर सध्या दीडशे ते दोनशे रुपयापर्यंत आहे. घाऊक बाजारात पुणे व मुंबई येथे सातारा, सांगली येथून जास्त आवक आहे. यंदा महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने फूलबागांचे नुकसान झाले आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत कर्नाटकमधील बंगळुरूला जेमतेम पाऊस असल्याने बागा वाचल्या आहेत. पुण्या-मुंबईच्या फुलांच्या घाऊक बाजारात बंगळुरूची फुले सध्या मोठ्या प्रमाणात येत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. स्थानिक फुलांच्या दराला परप्रांतांतील फुलांशी स्पर्धा करावी लागत आहे. जिल्ह्यात सातारा, वाई, खटाव, माण, फलटण, कोरेगाव, खंडाळा, जावळी, कराड तालुक्यांत शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात झेंडूची लागवड करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतू निचरा नसलेल्या शेतामधील उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे.

COMMENTS