Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तलाठ्याच्या चुकीमुळे वृध्द निराधार महिलेचे झाले पैसे बंद

नायगाव प्रतिनिधी - नायगाव तालुक्यातील गडगा येथील नुरा रज्जाक सय्यद या महिलेचे दरमहा निराधार चालू असलेले मानधन तलाठ्याच्या चुकीमुळे गेल्या आठ ते द

मुलाच्या हळदीत नाचतांना बापाचा मृत्यू
बियाणे, खाते खरेदी करताना शेतक-यांनी दक्षता घ्यावी
औसा बाजार समितीचे महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर

नायगाव प्रतिनिधी – नायगाव तालुक्यातील गडगा येथील नुरा रज्जाक सय्यद या महिलेचे दरमहा निराधार चालू असलेले मानधन तलाठ्याच्या चुकीमुळे गेल्या आठ ते दहा महिन्यापासून बंद झाल्याने असून. वृध्द निराधार महिलेवर उपासमारीची वेळ आली आहे.कंबरेचा आजार असतानाही पुन्हा दोन – तीन वेळा तहसील कार्यालय गाठू कागदपत्रांची पूर्तता करूनही मानधन जमा झाले नसल्याने डोळ्याला पदर लावून अश्रू गाळत निराश झाली आहे.
जबाबदार कर्मचार्‍यांच्या चुकीने एका नाहक वृध्द निराधार महिलेला त्रास सहन करावा लागत आहे.सदर महिलेचा मुलगा तलाठी असल्याने नाव कमी केल्याचे तोंड वर करून निराधार महिलेला सांगितले.पुन्हा काही दिवसांनी तलाठी चुकून झाल्याची कबूल केले.चुक दुरुस्ती साठी कागदपत्रे पुन्हा देवूनही आठ ते दहा महिने उलटले.तरीही निराधार मानधनाचा पत्ता नाही. तलाठ्याच्या बेजबाबदार पणाच्या वागणुकीमुळे वृध्द निराधार महिलेला मानधन पासून वंचित राहावे लागले.अतिशय गंभीर बाब असून. संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी विशेष लक्ष देऊन बेजबाबदार कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याची गरज आहे.गाव कर्मचार्‍यांच्या अळीशी धोरणांमुळे गोरगरीब वृध्द निराधार महिलेना हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे. तलाठी चुक करून सज्ज दुसर्याला देत आहे.या गंभीर प्रकरणी तहसीलदारांनी लक्ष देऊन सदर वृध्द महिलेचे दरमहा मानधन चालू करण्याची गरज आहे.

COMMENTS