जामखेड/प्रतिनिधी : गेल्या तीन वर्षांपासून ऐकायला न मिळणारे खंडणी हप्ता दादागिरी हे शब्द पून्हा सूरू झाल्याचे दिसत आहे. कलाकेंद्र चालकांनी मागित
जामखेड/प्रतिनिधी : गेल्या तीन वर्षांपासून ऐकायला न मिळणारे खंडणी हप्ता दादागिरी हे शब्द पून्हा सूरू झाल्याचे दिसत आहे. कलाकेंद्र चालकांनी मागितलेला हप्ता न दिल्याने गुंडाच्या टोळीने धुडगूस घालत लोखंडी पाईप व लाकडी दांडक्याने कलाकेंद्रात साहित्यांची तोडफोड करत दगडफेक केल्याची घटना घडली आहे.
या प्रकरणी अक्षय उर्फ चिंग्या मोरे (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) तुषार पवार,(पुर्ण नाव माहीत नाही) सोम्या पवार (पुर्ण नाव माहीत नाही) दोघे रा. जांबवाडी ता. जामखेड जि. अहमदनगर व इतर 4 ते 5 अनोळखी युवक अशा एकुण 7 ते 8 जणांविरोधात खंडणी व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणी फिर्यादी लता शालन जाधव (वय 55) सांस्कृतिक कलाकेंद्र मालक यांनी जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार 21 मार्च रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास जामखेड शहरातील झंकार सांस्कृतिक कला केंद्र, जगदंबा सांस्कृतिक कला केंद्र नगर रोड जामखेड व भाग्यलक्ष्मी कला केंद्र बीड रोड जामखेड या तीन कलाकेंद्रावर वरील आरोपींनी येऊन,तुम्हाला कलाकेंद्र चालवायचे असतील तर तुम्ही आम्हाला दर महिन्याला दहा हजार रुपये हप्ता द्यावा लागेल. मात्र कलाकेंद्र चालकांनी हप्ता देण्यास नकार दिल्याने आरोपींनी तिन्ही कलाकेंद्रावर धुडगूस घालण्यास सुरूवात केली. कलाकेंद्राच्या खिडक्यावर दगडफेक केली तसेच आरोपींनी त्यांच्या हातातील लोखंडी पाईप व लाकडी दांडक्याने कलाकेंद्रातील खुर्च्या, कुलर, पीओपीची मोडतोड करत नुकसान केले. आरोपींनी केलेल्या दगडफेकीमध्ये फिर्यादी कलाकेंद्राच्या मालकिण लता शालन जाधव, कलावंतीनी, निता खवळे बारामतीकर, शारदा खवळे बारामतीकर या तिघी जखमी झाल्या. तसेच आरोपी यावर न थांबता कलाकेंद्र चालकांना जाताना म्हणाले की, तुम्ही जर आता हप्ता दिला नाही तर तुम्हाला बघून घेऊ म्हणून शिवीगाळ केली. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाँ संजय लोखंडे हे करत आहेत.
या टोळ्यांना कोण पोसतय ? – खंडणी, हप्ते मागणार्या टोळ्यांमुळे शहरासह ग्रामीण भागातील लोकांमध्ये व छोट्या मोठ्या व्यापारयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दूसरयांच्या कमाईवर डोळा ठेवणार्या व कष्टकरी गरिब लोकांवर अन्याय करणारया या टोळ्यांना कोण पोसतय? या खंडणी व हप्त्यांचा बाजपेठेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. याची दखल पोलीस प्रशासन वेळीच घेईल का? अशी प्रश्नार्थक चर्चा नागरिकांमधून ऐकायला मिळत आहे.
COMMENTS