नवी दिल्ली : उत्तर भारतात हवामानाने पुन्हा एकदा तीव्र स्वरूप धारण केले असून पर्वतीय भागात पावसासह बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या बदलत्या ह

नवी दिल्ली : उत्तर भारतात हवामानाने पुन्हा एकदा तीव्र स्वरूप धारण केले असून पर्वतीय भागात पावसासह बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या बदलत्या हवामानाचा परिणाम मैदानी भागांवरही जाणवत असून राजधानी दिल्लीसह आसपासच्या परिसरात दाट धुक्याची चादर पसरली आहे. परिणामी जनजीवन विस्कळीत झाले असून विशेषतः वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण आला आहे.
दिल्ली आणि उत्तर भारतातील अनेक भागांत सकाळच्या वेळी दृष्यमानता अत्यंत कमी झाल्याने रेल्वे, रस्ते व हवाई वाहतुकीवर परिणाम झाला. धुक्यामुळे रेल्वेगाड्यांचा वेग कमी करण्यात आल्याने अनेक गाड्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा तासन्तास उशिराने धावत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. मंगळवारी दिल्लीकडे येणार्या तसेच दिल्लीहून सुटणार्या डझनभर रेल्वेगाड्या विलंबाने धावत होत्या. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या दोन ते तीन तास उशिरा पोहोचल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. सिरसा एक्सप्रेस सुमारे एक तास, इंटरसिटी एक्सप्रेस दीड तास, हावडा-नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस दीड तासांहून अधिक, तर भुवनेश्वर-नवी दिल्ली तेजस राजधानी एक्सप्रेस जवळपास दोन तास उशिरा धावली. याशिवाय डिब्रूगढ, सियालदह, बनारस, रांची आणि राजेंद्र नगर टर्मिनलहून येणार्या राजधानी, सुपरफास्ट, गरीब रथ आणि अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांनाही मोठा विलंब सहन करावा लागला.

COMMENTS