Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईत दीड कोटीचे अमली पदार्थ जप्त

मुंबई/प्रतिनिधी ः मुंबई पोलिसांनी विविध भागात छापे टाकून 1.64 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. या कारवाईत 7 तस्करांना अटक करण्यात आली आ

महिला मल्लांनाही मिळणार महाराष्ट्र केसरी होण्याचा मान | LOKNews24
आरक्षणप्रश्‍नी तोडगा नाही, केवळ दिशाभूल
लसीचे कंत्राट कोणाला दिले?, तुझ्या बापाला l पहा LokNews24

मुंबई/प्रतिनिधी ः मुंबई पोलिसांनी विविध भागात छापे टाकून 1.64 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. या कारवाईत 7 तस्करांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी एकूण 6 एफआयआर दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती लखमी गौतम (पोलिस सह आयुक्त-गुन्हे) यांनी दिली आहे.
विशेष म्हणजे, जप्त केलेल्या अमली पदार्थांमध्ये 354 ग्रॅम एम.डी. (मेफेड्रॉन) अंदाजे किंमत 70.80 लाख रुपये, 92 ग्रॅम हेरॉईन अंदाजे किंमत 27.72 लाख रुपये, 280 ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा अंदाजे किंमत 28 लाख रुपये, एक किलो 23 ग्रॅम चरस अंदाजे किंमत 36.90 लाख रुपये असा एकूण दोन किलो वजनाचे किंमत अंदाजे 1 कोटी 64 लाख किमतीचे विविध अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. जप्त केलेले अंमली पदार्थ महावीर नगर (कांदिवली-पश्‍चिम), ऑबेरॉय माल जवळ (गोरेगाव-पूर्व), जेल रोड (डोंगरी), माहिम पश्‍चिम, नवीन टिळकनगर (चेंबूर) आणि चारकोप (कांदिवली-पश्‍चिम) मध्ये 15 एप्रिल ते 22 एप्रिल या कालावधीत छापा टाकून जप्त केले.

COMMENTS