Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भिवंडीत 800 कोटींचे ड्रग्ज जप्त

मुंबई ः महाराष्ट्र आणि गुजरात राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज जप्त करण्यात आल्याच्या घटना उजेडात येत असतांना, गुजरातच्या एटीएसने भिवंडी परिसर

न भयं न लज्जा !
पुण्यातून 46 लाखाचे अमली पदार्थ जप्त
मुंबईत दीड कोटीचे अमली पदार्थ जप्त

मुंबई ः महाराष्ट्र आणि गुजरात राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज जप्त करण्यात आल्याच्या घटना उजेडात येत असतांना, गुजरातच्या एटीएसने भिवंडी परिसरातील नदी नाका परिसरात असलेल्या एका फ्लॅटमध्ये छापेमारी केली. यावेळी त्यांनी सुमारे 800 कोटी रुपयांचा अंमली पदार्थाच्या साठ्यासह दोघांना अटक केली. मात्र भिवंडीत सुरू असलेल्या या अंमली पदार्थाच्या गोरखधंदाबद्दल मुंबई, ठाणे, भिवंडी पोलिस प्रशासनाला खबर नसल्याचे दिसून आले आहे. मोहम्मद युनूस आणि मोहम्मद आदिल असे 800 कोटींच्या ड्रग्सच्या साठ्यासह अटक केलेल्या माफियांची नावे आहेत. तर दोघेही भाऊ असल्याचे गुजरात एटीसीच्या छापेमारीत उघडकीस आले. एटीएसच्या पथकाने घटनास्थळावरून 792 किलो लिक्विड एमडी ड्रग जप्त केले असून त्याची किंमत 800 कोटी रुपये आहे. याप्रकरणी मोहम्मद युनूस आणि मोहम्मद आदिल यांना अटक करण्यात आली आहे. एटीएसने केलेल्या कारवाई विषयी माहिती देतांना गुजरात एटीएसचे डीआयजी सुनील जोशी म्हणाले, हे दोघेही यापूर्वी दुबईत तस्करी करायचे. सुरत प्लांट प्रकरणात या दोघांची भूमिका समोर आली होती. यानंतर छापा टाकण्यात आला. यामध्ये एटीएसला हे यश मिळाले. एटीएस पथकाने तांत्रिक तपासाच्याआधारे संशयितांच्या ठिकाणांची पुष्टी केली. त्यानंतर 5 आणि 6 ऑगस्ट रोजी गुजरात एटीएसचे पीआय एच.पनारा आणि त्यांच्या पथकानं आरोपीच्या भिवंडी फ्लॅटवर छापा टाकला. दरम्यान, त्यांच्याकडून 782.263 किलो एमडी द्रव जप्त करण्यात आला आणि तयार करण्याच्या प्रक्रियेत 10 किलो एमडी सापडले. आंतरराष्ट्रीय बाजारातील दरानुसार या एमडीची एकूण किंमत 800 कोटी रुपये आहे.  

COMMENTS