Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात अंमली पदार्थांची तस्करी वाढली

2 कोटी 20 लाखांचे कोकेन जप्त

पुणे प्रतिनिधी - गेल्या काही महिन्यांपासून पुणे शहराला अंमली पदार्थांचा विळखा वाढतांना दिसून येत आहे. तरुणाई मोठया प्रमाणावर अंमली पदार्थांच्या आ

जन्मदात्या आईवर बलात्कार करणाऱ्या मुलाला जन्मठेप | LOKNews24
सखींनी जाणून घेतला सुदृढ आरोग्‍याचा मुलमंत्र
पोलिस उपअधीक्षक पथकासमोरच दोघांची जुंपली

पुणे प्रतिनिधी – गेल्या काही महिन्यांपासून पुणे शहराला अंमली पदार्थांचा विळखा वाढतांना दिसून येत आहे. तरुणाई मोठया प्रमाणावर अंमली पदार्थांच्या आहारी जातांना दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणात ड्रग्स तस्करी पुण्यात होत असून अनेक तस्करांवर कारवाई करण्यात आली आहे. शुक्रवारी देखील पुणे शहर पोलीस गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत तब्बल 2 कोटी 20 लाख रुपयांचे 1 किलो कोकेन जप्त केले आहे. आतापर्यन्तची ही सर्वात मोठी कारवाई समजली जात आहे.


या प्रकरणी एका नायजेरीयन तरुणाला अटक करण्यात आली आहे. अब्दुल अझीज अन्डोई असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पुणे पोलीस आयुक्त डॉ. अमिताभ गुप्ता व सह आयुक्त संदीप कर्णिक यांनी अंमली पदार्थ विक्रेत्यांबाबत माहिती काढून कडक कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार अंमली पदार्थ विरोधी पथक 1 कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहा पोलीस निरीक्षक, लक्ष्मण ढंगळे, शैलजा जानकर व त्यांच्या पथकाने गुरुवारी रात्री, कोंढवा पोलीस ठाण्यांतर्गत गस्तीवर असतांना मोठ्या प्रमाणात कोकेन विक्री साठी येणार असल्याची माहिती मिळाली. आरोपी फॉलरिन अब्दुलअझीज अन्डोई उंड्री मंतरवाडी परिसरात आर पॉईन्ट सोसायटीच्या समोर हा त्याच्या कारमध्ये बसला होता. दरम्यान, त्याची ओळख पटवून त्याच्यावर पथकाने कारवाई केली. त्याला अटक करून त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे 2 कोटी 20 लाख 8000रुपयांचे 01 किलो 81 ग्रॅम कोकेन सापडले. पोलिसांनी या कोकेनसह सहा मोबाईल फोन, एक कार आणि दोन इलेक्ट्रॉनिक वजन काटे जप्त केले. तसेच आरोपीवर एन. डी. पी. एस. अ‍ॅक्ट कलम 8 (क). 21(क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

COMMENTS