Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोलिस भरतीचे स्वप्न अधुरे…व्यायाम करणार्‍या युवकाचा अपघाती मृत्यू

नगर तालुक्यातील बाबुर्डी घुमट ते वाळकी रस्त्यावर घडली दुर्घटना

अहमदनगर/प्रतिनिधी ः भरधाव वाहनाच्या धडकेत पोलिस आणि लष्कराच्या भरतीसाठी सराव करणा़र्‍या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. नगर तालुक्यातील बाबुर्डी घुम

आषाढी वारी करुन परतत असताना वारकऱ्यांच्या गाडीला जबर अपघात .
मुक्ताईनगर जवळ राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात
सख्या भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू नसून घातपातच

अहमदनगर/प्रतिनिधी ः भरधाव वाहनाच्या धडकेत पोलिस आणि लष्कराच्या भरतीसाठी सराव करणा़र्‍या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. नगर तालुक्यातील बाबुर्डी घुमट ते वाळकी रस्त्यावर बुधवारी (14 डिसेंबर) सकाळी ही घटना घडली. योगेश बबन पंचमुख (वय 20, रा. बाबुर्डी घुमट, ता. नगर) असे मृत युवकाचे नाव आहे.


योगेश हा न्यू आर्ट्स महाविद्यालयात पदवीच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. बाबुर्डी घुमट गावातील महाविद्यालयीन शिक्षण घेणारे काही तरुण सध्या पोलिस व लष्कर भरतीसाठी तयारी करीत आहेत. त्यामुळे दररोज पहाटे ते धावण्याच्या सरावासाठी बाबुर्डी ते वाळकी रस्त्यावर जात असतात. बुधवारी (दि. 14) पहाटे योगेश आपल्या दोन मित्रांसह व्यायामासाठी गेला होता. बाबुर्डी गावापासून वाळकीकडे जाणा़र्‍या रस्त्यावर ते विश्रांतीसाठी बसले होते. त्याचवेळी नगरहून वाळकीकडे जाणा़र्‍या भरधाव वाहनाने योगेशला जोराची धडक दिली. त्याच्या डोक्यावरून वाहनाचे चाक गेल्याने तो गंभीर जखमी झाला. अपघातानंतर वाहनचालक तेथे न थांबता वाहनासह पसार झाला. जखमी योगेशला तातडीने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथे उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.


पोलिस व लष्करी भरतीसाठी व्यायामाचा सराव करीत असलेल्या योगेशच्या दुर्दैवी अपघाती मृत्यूने बाबुर्डी घुमट व परिसरावर शोककळा पसरली आहे. याबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असली तरी पोलिसांनी तातडीने त्याचा शोध घेऊन त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

COMMENTS