Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दिव्यांगांच्या राज्य नाट्य स्पर्धेत “रिले” नाटक प्रथम 

रचना विद्यालयाच्या कर्णबधीर विभागाची बाजी

नाशिक - महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभाग आयोजित चतुर्थ दिव्यांग राज्य नाट्य स्पर्धा 2023  स्पर्धेत येथील महाराष्ट्र समाज सेवा संघ संचालित रचना वि

अवैध पाणी कनेक्शन्स तोडले…मनपा अभियंत्याचे जाहीर कौतुक
राजारामबापू सहकारी बँकेस 36.48 कोटींचा नफा : शामराव पाटील
तरुणांनी नौकरीच्या मागे न लागता व्यवसाय करावा – बी.व्ही.मस्के

नाशिक – महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभाग आयोजित चतुर्थ दिव्यांग राज्य नाट्य स्पर्धा 2023  स्पर्धेत येथील महाराष्ट्र समाज सेवा संघ संचालित रचना विद्यालय अपंग एकात्म शिक्षण योजना कर्णबधीर विभागाने ” *रिले* ” नाटिका सादर केली होती. या नाटकेला *प्रथम क्रमांका*चे पारितोषिक जाहीर झाले आहे.

          या नाटकाचे दिग्दर्शक सिने अभिनेता धनंजय वाबळे होते.  या राज्य नाट्य स्पर्धेत त्यांना दिग्दर्शकाचे प्रथम पारितोषिक मिळाले असून, या स्पर्धेत रचना विद्यालयाची विध्यार्थीनी क्षितिजा भावसार हिस उत्कृष्ट अभिनय (स्त्री) रौप्यपदक मिळाले. क्षितिजाने रिले या नाटकात “भुरी” या ग्रामीण मुलीची भूमिका केली होती. प्रकाश योजनेचे कृतार्थ कंसारा यांना प्रथम पारितोषिक तर रंगभूषा वेशभूषेचे मीनाक्षी बागल, नीता घरत यांना द्वितीय पारितोषिक जाहीर झाले. अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे ऋतुजा देसले, समर्थ डाके या कलाकारांना गुणवत्ता प्रमाणपत्रे जाहीर झाले आहेत. नाटकाला संगीत रोहित सरोदे यांनी दिले तर नेपथ्य नीता घरत, मीनाक्षी बागल यांनी सांभाळले. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र समाज सेवा संघाचे अध्यक्ष  सुधाकर साळी, सर्व कार्यकारणी सदस्य , रचना विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संगीता टाकळकर, उपमुख्याध्यापिका सुषमा जोशी, पर्यवेक्षक महाजन यांचे मार्गदर्शन लाभले. सांस्कृतिक क्षेत्रात रचना विद्यालयाचा राज्यात या निमित्ताने डंका पिटला गेला आहे.

COMMENTS