Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीडमधील रस्त्यांची कामे गतीने पूर्ण होणार डॉ.योगेश क्षीरसागर

शहरातील विकासकामांची पाहणी;नागरिकांशी साधला संवाद

बीड प्रतिनिधी - शहर विकासाबाबत परिपूर्ण करण्याच्या दृष्टीने कामे झालेली आहेत. मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिलेला आहे. शहरात सुरू असलेल

नक्षल्यांवर दया-माया नको… सडेतोड उत्तर देण्याचे मंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश
अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी एस.एम.युसूफ़ यांची नियुक्ती
सुरेशनगरमध्ये मोतीबिंदू शस्रक्रिया शिबीर उत्साहात

बीड प्रतिनिधी – शहर विकासाबाबत परिपूर्ण करण्याच्या दृष्टीने कामे झालेली आहेत. मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिलेला आहे. शहरात सुरू असलेली आणि नव्याने होऊ घातलेली रस्त्यांसह इतर विकासकामे गतीने पूर्ण व्हावीत, यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करू, अशी ग्वाही युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी दिली.
बीड शहरातील बार्शी रोडलगत कुल्सुम मस्जिद परिसर, बिलाल नगरातील स्थानिक नागरिकांशी रविवारी त्यांनी संवाद साधला. तसेच, शहरातील कदम गल्ली, भगवान बाबा प्रतिष्ठानजवळील प्रभात गल्लीत रस्त्याच्या कामाला सुरुवात केली. यावेळी डॉ.योगेश क्षीरसागर हे बोलत होते. याप्रसंगी प्रमुख उपस्थितीत मा.नगरसेवक राजेंद्र काळे, विनोद मुळूक, मुखीद लाला, हाजी अब्दुल सलिम तैमुरे, मौलाना इद्रिस, मौलाना कासिम, हाजी अब्दुल बारी तैमुरे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ.योगेश क्षीरसागर म्हणाले, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, माजी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या पाठपुराव्यातून शहरात सिमेंट रस्त्यांचे जाळे निर्माण केले आहे. रस्ते, नाली कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. नागरिकांच्या पाणी, विद्युत तारांबाबत समस्या मांडल्या असून त्या मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. नगरोत्थान योजनेअंतर्गत रस्त्यांची दर्जेदार कामे झाली. विरोधकांकडून अडवणूक करण्याचा अनेकदा प्रयत्न झाला, परंतु प्रशासकीय पातळीवर सातत्यपूर्ण पाठपुरावा करून अधिकाधिक विकासकामे केली. आजपर्यंत शहरवासीयांनी मोलाची साथ दिली असून तुमचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द आहे, असा शब्द डॉ.योगेश क्षीरसागर यांनी उपस्थितांना दिला आहे. यावेळी हाजी अब्दुल मझहर, हाजी अब्दुल वहाब, असरार शेख, आमेर सिद्दीकी, सलीम टिंबोडे, अब्दुल बारी तिंबोडे, जमील तिंबोडे, खतीब इमाम, माजेद कुरेशी, शुभम कातांगळे, इम्रान शेख, माजेद कुरेशी, साजेद जागीरदार, काशिफ चाऊस, बाबा खान, फरदीन खान, अनिल देवतरासे, मिलिंद ठोकळ, अशोक कदम, काझी रिझवान, अब्दुल सलमान, मोमीन तोसिफ, ताहेर शेख, नितीन जायभाये यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बीड शहरातील कदम गल्लीतील सिमेंट रस्त्याचे काम युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत सुरू झाले. यावेळी नगरसेवक राजेंद्र काळे यांच्यासह स्थानिक नागरिकांची उपस्थिती होती. तसेच, भगवान बाबा प्रतिष्ठानजवळील प्रभात गल्लीतील रस्त्याचा प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागला आहे. याभागात होणार्या धार्मिक कार्यक्रमांना भाविक हजेरी लावतात. त्यामुळे नागरिकांसह भाविकांना दिलासा मिळणार आहे. या सिमेंट रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. याप्रसंगी डॉ.क्षीरसागर यांच्यासह बप्पासाहेब घुगे, सतिश बिडवे, फुलचंद हांगे, विक्रम चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार जगदीश पिंगळे, अंबादास नवले, शेख जवकर, वसंत कदम यांच्यासह कार्यकर्ते, स्थानिक नागरिक उपस्थित होते. दरम्यान, डॉ.क्षीरसागर यांनी नागरिकांच्या समस्यांची निवेदने स्वीकारून समस्या सोवण्याबाबत आश्वस्त केले.

COMMENTS