Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ.उपाध्ये यांची कथा विद्यार्थ्यांना जागृत करणारी ः  द.सा. रसाळ

श्रीरामपूर ः मराठी साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांची कथा अभ्यासक्रमात समाविष्ट होणे ही आमच्या सारख्या साहित्यिकांना प्रेरणा देणारी असून त्यांची

डॉ. सी. एम. मेहता कन्या विद्यालयाची ज्ञानेश्‍वरी लोहकणे तालुक्यात प्रथम
शेत जमीन व्यवहार फसवणुक प्रकरणी महेश संचेतीवर कोतवालीतही गुन्हा दाखल
जामखेडमध्ये विवाहितेवर अत्याचार

श्रीरामपूर ः मराठी साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांची कथा अभ्यासक्रमात समाविष्ट होणे ही आमच्या सारख्या साहित्यिकांना प्रेरणा देणारी असून त्यांची कथा ही युवा विद्यार्थ्यांना आपल्या अवतीभवती होणार्‍या समाजविकृत घटनेपासून जागृत करणारी आहे, असे मत संगमनेर तालुका ज्येष्ठ नागरिक महासंघाचे सदस्य द.सा. रसाळगुरुजी यांनी व्यक्त केले.
    येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांची’– आणि कमल सापडली’ ही कथा अभ्यासक्रमात समाविष्ट        झाल्याबद्दल डॉ. उपाध्ये यांचा सत्कारप्रसंगी रसाळगुरूजी बोलत होते. यावेळी अ‍ॅड. रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानचे कार्यकारिणी अध्यक्ष, माजी प्राचार्य टी.ई. शेळके, आसरा प्रकाशनचे डॉ. शिवाजी काळे, मोहिनी काळे, प्रा. शिवाजीराव बारगळ, वसंतराव मुठे पाटील, सुयश काळे, मनिषा रसाळ आदीसह ज्येष्ठ मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्राचार्य शेळके, डॉ. शिवाजी काळे, प्रा. बारगळ आदिंनी मनोगत व्यक्त केले. डॉ. उपाध्ये यांनी कथेची माहिती दिली. खेड्यातील कमल नावाच्या विद्यार्थिनीचे अपहरण आणि गरीब शेतकरी बापाची होणारी वेदनामय धावपळ हृदयस्पर्शी चित्रित झाली आहे. गावातील रिकामटेकडी मुले दहशतवादी प्रवृत्तीच्या नादी लागून थोड्या पैशाच्या मोहाने विद्यार्थिनींना फूस लावून पळून नेतात. परप्रांतीय, परदेशी हस्तकांच्या हवाली करतात, गावातील जागृत युवक आणि गावकरी या मुलींची सुटका करतात. गाव आणि नागरिक जागृत असतील तर गावातील, गावाबाहेरील पोरधरी, अपहरणकर्ते, दहशतवादी आणि संशयित यांना वचक बसेल. पोलिसांच्या तावडीत सापडायला नको म्हणून ऊसात पळणार्‍या अपहरणकर्ते बिबट्याच्या जबड्यात सापडतात, करावे तसे भरावे असा संदेश देणारी ही कथा आहे. विद्याथी आणि युवकांना जागृत करणारी, आजचा महत्त्वाचा प्रश्‍न मांडणारी ही कथा असल्याची माहिती त्यांनी दिली. रसाळ गुरुजींनी या कथेचे कौतुक करून डॉ. उपाध्ये यांचा शाल, श्रीफळ, बुके, भेटवस्तू, पुस्तके देऊन सत्कार केला.

COMMENTS