नाशिक- इंडियन सोसायटी फॉर असिस्टेड रिप्रोडक्शन (इसार) या संस्थेतर्फे नुकताच भुवनेश्वर (ओडिसा) येथे राष्ट्रीय स्तरावरील तीन दिवसीय परीषद पार
नाशिक– इंडियन सोसायटी फॉर असिस्टेड रिप्रोडक्शन (इसार) या संस्थेतर्फे नुकताच भुवनेश्वर (ओडिसा) येथे राष्ट्रीय स्तरावरील तीन दिवसीय परीषद पार पडली. या परीषदेत देशभरातील निवडक ११ तज्ज्ञ डॉक्टरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये नाशिकमधील प्रसिदध स्त्रीरोग तज्ज्ञ व वंधत्व निवारण तज्ज्ञ डॉ.उमेश मराठे यांनाही या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
राष्ट्रीय स्तरावरील परीषदेत देशभरातून सहभागी झालेल्या डॉक्टरांना मार्गदर्शन करण्यासाठी देश-विदेशातून निष्णात तज्ज्ञ उपस्थित झाले होते. वंधत्व निवारणाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्या डॉक्टरांचा या परीषदेच्या व्यासपीठावर सत्कार करण्यात आला. या निवडक ११ पुरस्कारार्थींमध्ये डॉ.उमेश मराठे यांचाही समावेश होता. इंडियन सोसायटी फॉर असिस्टेड रिप्रोडक्शनच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. नंदिता पालशेतकर आणि इसार २०२४ या परीषदेच्या आयोजन समितीच्या अध्यक्षा डॉ.सुजाता कार यांच्या हस्ते डॉ.उमेश मराठे यांनी ‘इसार’चा हा विशेष पुरस्कार स्वीकारला. तसेच या परीषदेत सहभागी होतांना डॉ.मराठे यांनी एका सत्रातून सर्व सहभागी डॉक्टरांना मार्गदर्शनदेखील केले. गर्भरोपणाचे तंत्र जितके प्रभावी असेल तितका उपचाराला प्रतिसाद चांगला मिळू शकतो. त्यामुळे डॉक्टरांनी आपल्या कौशल्यांचा वापर करतांना ही उपचार प्रक्रिया पार पाडावी, असा सल्ला त्यांनी सहभागींना दिला. तसेच उपचार प्रक्रियेदरम्यानचे सूक्ष्म बारकावेदेखील त्यांनी उपस्थितांना सांगितले. दरम्यान डॉ.उमेश मराठे यांना मिळालेल्या या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराबद्दल वैद्यकीय क्षेत्र, स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेकडून त्यांचे अभिनंदन केले जाते आहे.
COMMENTS