Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. आंबेडकरांच्या विचारांवर मार्गक्रमण करणे हीच खरी आदरांजली – आमदार आशुतोष काळे

कोपरगाव प्रतिनिधी : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे भविष्याचा वेध घेण्याची दूरदृष्टी होती. जसा माणूस उपासमारीने अशक्त होऊन अल्पायुषी होतो, तसा

आमदार आशुतोष काळेंनी भाविकांना केले फराळ वाटप
धारणगाव, कुंभारीच्या मुस्लिम दफनभूमीचा प्रश्‍न मार्गी
नुकसानीचे पंचनामे करण्याच्या आ. काळेंच्या तहसीलदारांना सूचना

कोपरगाव प्रतिनिधी : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे भविष्याचा वेध घेण्याची दूरदृष्टी होती. जसा माणूस उपासमारीने अशक्त होऊन अल्पायुषी होतो, तसा तो शिक्षणाअभावी दुसर्‍याचा गुलाम होतो हि त्यांची विचारसरणी होती. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे माध्यम असून त्यांनी शिक्षणाला सर्वाधिक महत्व दिले. काळानुरूप होणार्‍या बदलांना सामारे जाण्यासाठी शिक्षण उपयोगी पडणार आहे आजही आपल्यापुढे अशी अनेक आवाहन असून या आव्हानांना  सामोरे जाण्यासाठी त्यांची विचारसरणी अंगीकारून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर मार्गक्रमण करणे हीच त्यांना खरी आदरांजली राहील असे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले.


           भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोपरगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आ. आशुतोष काळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार प्रेरणा देणारे आहेत. त्यामुळे दरवर्षी त्यांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी मुंबई, नागपूर आदी ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येत असतात. मात्र मागील दोन वर्ष जागतिक कोरोना महामारी असल्यामुळे सामुहिक अभिवादन करता आले नाही. मात्र कोरोना संकट संपुष्टात आल्यामुळे यावर्षी सर्व अनुयायांना अभिवादन करणे शक्य झाले आहे. अर्थशास्त्रज्ञ, समाजसुधारक, लेखक, निष्णात कायदेतज्ञ, समाजशास्त्रज्ञ, राज्यशास्त्रज्ञ, पत्रकार असे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू असून अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पहिले भारतीय होते. त्यांनी दलित, स्त्रिया, मजूर यांच्यावरील सामाजिक भेदभावाविरुद्ध आयुष्यभर लढा दिला. त्यांच्या विचारांची प्रेरणा घेवून त्यांच्या विचारांवर सर्वांनी वाटचाल करावी असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी यावेळी केले. यावेळी माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे, महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सूर्यभान कोळपे, दिनार कुदळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, कृष्णा आढाव, रमेश गवळी, फकीर कुरेशी, अजीज शेख, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शहराध्यक्ष कार्तिक सरदार, सुनील मोकळ, प्रकाश दुशिंग, डॉ. तुषार गलांडे, राहुल देवळालीकर, चंद्रशेखर म्हस्के, सचिन परदेशी,सुनील बोरा, दादासाहेब साबळे, संदीप कपिले, संतोष शेजवळ, रोशन शेजवळ, कैलास मंजुळ, शंकर घोडेराव, आकाश डागा, मनोज कडु,एकनाथ गंगूले, राजेंद्र आभाळे, हारुण शेख, शिवाजी कुर्‍हाडे, प्रदीप कुर्‍हाडे, विलास पाटोळे, महेश कोळपे, विक्रम पांढरे, शंकर घोडेराव, चांदभाई पठाण, इम्तियाज अत्तार, मुन्ना पठाण, बाळासाहेब सोनटक्के, मनोज नरोडे, महेश उदावंत, हरिदास जाधव, बाळासाहेब शिंदे, तेजस साबळे, योगेश वाणी, संदीप सावतडकर, मुकुंद इंगळे, राजेंद्र खैरनार, किशोर डोखे, संजय लोहारकर, किरण बागुल, बाळासाहेब बारसे, अमोल गिरमे, आकाश गायकवाड, दिनेश संत, आदी उपस्थित होते.

COMMENTS