डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात दुसऱ्या साक्षीदाराची साक्ष

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात दुसऱ्या साक्षीदाराची साक्ष

पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या सुरू झालेल्या खटल्यातील दुसरा साक्षीदार श्याम मारणे यांची साक्

बीड पुन्हा हादरले! ऊसतोड मजुराच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार | LOKNews24
ब्रह्माकुमारी संस्थेच्या वर्धापन दिन उत्साहात साजरा  
बेड नसल्याने रुग्णांना खूर्चीवर बसवून ऑक्सिजन देण्याची वेळ | ‘१२च्या १२बतम्या’ | LokNews24

पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या सुरू झालेल्या खटल्यातील दुसरा साक्षीदार श्याम मारणे यांची साक्ष नोंदविण्यात आली. यावेळी न्यायालयात डॉ. दाभोलकरांचा तुटलेला चष्मा, चपलेचा जोड, दोन लाईव्ह बुलेट, दोन रिकाम्या बुलेट, कंट्रोल ब्लड सॅंम्पल तसेच ससूनमधून दाभोलकर यांचे कपडे, पाकीट, एस.टीची तिकिटे, किल्ल्यांचा जुडगा आदी पंचनाम्यावेळी सीलबंद करून जप्त केलेले साहित्य न्यायालयात आणण्यात आले होते. त्यावर मारणे यांची साक्ष झाली.
डॉ. दाभोलकर यांची हत्या झाल्यानंतर घटनास्थळी पंच म्हणून श्याम मारणे यांना बोलविण्यात आले होते. डेक्कन पोलीस स्टेशनचे जोशी यांनी पंचनामा केला होता, अशी माहिती या प्रकरणातील सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी न्यायालयाला दिली. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे. तुमचे आणि पोलिसांचे संबंध आहेत. पोलीस शांतता कमिटीचे आपण सदस्य आहात.तुमचे एक हॉटेल आहे, त्यामुळे पोलिसांशी तुमची चांगली ओळख आहे. तुमच्या देखत कोणत्याही वस्तू जप्त करण्यात आलेल्या नाहीत, अशी बचाव पक्षातर्फे मारणे यांची उलतपासणी घेण्यात आली. त्यावर मारणे यांनी मी शांतता कमिटीचा सदस्य आहे.

COMMENTS