Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. शुभम कांडेकर आणि चैतालीताई खटी पुरस्कार

विश्‍वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर/प्रतिनिधी ः येथील बोरावकेनगरमधील विश्‍वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय पुरस्कार उंबरगावचे प्रसिद्ध कीर्तनकार, प्रवचनकार

काँग्रेस नेते थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त किर्तन महोत्सव
स्वस्त धान्य दुकानदाराचा इतरत्र लंपास होत असलेला माल पकडला
दुष्काळसदृष्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज रहावे

श्रीरामपूर/प्रतिनिधी ः येथील बोरावकेनगरमधील विश्‍वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय पुरस्कार उंबरगावचे प्रसिद्ध कीर्तनकार, प्रवचनकार ह. भ. प. आचार्य डॉ. शुभम महाराज कांडेकर आणि मुंबई येथील समाजप्रबोधनकार, सामाजिक कार्यकर्त्या चैतालीताई विजय खटी यांना पुरस्कार घोषित झाले असून सोमवार 10 जुलै रोजी ’उसगावचा संतमहिमा ’पुस्तक प्रकाशन सोहळा आणि स्व.सौ.पुष्पाताई सुखदेव सुकळे  पुण्यस्मरण तसेच पुरस्कार वितरण सोहळा आहे, असे विश्‍वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे यांनी कळविले आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काकासाहेब कोयटे ह कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असून अ‍ॅड, रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष माजी प्राचार्य टी. ई. शेळके अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.च ंद्रपूर जिल्ह्यातील उसगाव येथील तपस्वी साक्षात्कारी संत काशिनाथ महाराज समाधी शताब्दीनिमित्त ’उसगावचा संतमहिमा ’या पुस्तकाचे प्रकाशन व स्व. पुष्पाताई सुखदेव सुकळे यांचा प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सोहळा होणार आहे. ह.भ.प.आचार्य डॉ. शुभम महाराज कांडेकर यांना साक्षत्कारी संत काशिनाथ महाराज स्मृतीप्रीत्यर्थ  राज्यस्तरीय पुरस्कार तर मुंबई येथील सामाजिक कार्यकर्त्या, समाजप्रबोधनकार सौ. चैतालीताई विजय खटी यांना स्व. पुष्पाताई सुखदेव सुकळे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ राज्यस्तरीय स्त्रीशक्ती सन्मान पुरस्कार2023 मान्यवरांच्या हस्ते बेलापूर रोडवरील साईसुधा काळे रसवंती गृह येथील व्यासपीठावर सोमवार 10 जुलै 2023 रोजी सकाळी 10 वाजता देण्यात येणार आहे, या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. राजीव रावसाहेब शिंदे, कार्याध्यक्ष प्राचार्य टी.ई. शेळके, समन्वयक, मार्गदर्शक डॉ. बाबुराव उपाध्ये, संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे, सदस्य सुदामराव औताडे पाटील आदिंनी केले आहे.

COMMENTS