Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवांकुर पतसंस्थेच्या चेअरमनपदी डॉ. प्रकाश पवार

राहुरी ः राहुरी तालुक्यातील नामांकित अग्रगण्य समजल्या जाणार्‍या शिवांकुर अर्बन को ऑफ क्रेडिट सोसायटी राहुरीच्या संचालक मंडळाची नुकतीच बिनविरोध नि

 गावोगावच्या शाळांना राजकारणाचा अड्डा बनवू नका ः भरत आंधळे
राहुरी फॅक्टरी येथे ठाकरे गटाकडून जोडे मारो आंदोलन
खुल्या बुद्धीबळ स्पर्धेत रंगला शह-काटशह…

राहुरी ः राहुरी तालुक्यातील नामांकित अग्रगण्य समजल्या जाणार्‍या शिवांकुर अर्बन को ऑफ क्रेडिट सोसायटी राहुरीच्या संचालक मंडळाची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. निवडून आलेल्या संचालकांमधून चेअरमन व व्हाईस चेअरमन यांची निवड निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती एम ए शेख मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली.
श्रीमती एम.ए.शेख यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित संचालकांच्या सभेमध्ये चेअरमन पदासाठी डॉ नरेंद्र इंगळे यांनी डॉ प्रकाश रावसाहेब पवार यांच्या नावाची सूचना मांडली व सदर सूचनेस डॉ किशोर पवार यांनी अनुमोदन दिले. डॉ प्रकाश पवार यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सर्वानुमते चेअरमनपदी निवड करण्यात आली तर व्हाईस चेअरमन पदासाठी नारायण निमसे यांचा एकमेव अर्ज आल्याने तसेच त्यांच्या नावाची सूचना गणेश शेळके यांनी तर सदर सूचनेस किशोर शिरसाट यांनी अनुमोदन दिले तदनंतर सर्वानुमते नारायण धोंडीराम निमसे यांची व्हाईस चेअरमन पदी निवड करण्यात आली. सदर निवड प्रसंगी सर्व नवनिर्वाचित संचालक भास्करराव नामदेव पवार, गणेश विष्णू शेळके, डॉ नरेंद्र तुळशीराम इंगळे, डॉ किशोर उत्तम पवार, किशोर अण्णासाहेब शिरसाट, अशोक बन्सी पवार, संध्या जालिंदर धुमाळ, सौ मंगल रावसाहेब पवार आधी उपस्थित होते. प्रसंगी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब नामदेव पवार, सतीश भुजाडी, भाग्यश्री झांबरे, कल्याणी नेवासकर, अर्चना पाळंदे, उत्तम सुरेश पवार, जालिंदर धुमाळ, तुषार तमनर आदी मान्यवर उपस्थित होते. नवनिर्वाचित चेअरमन, व्हा चेअरमन, संचालक यांचे सर्व सामाजिक, राजकीय, शैक्षणिक स्तरातून अभिनंदन होत आहे.

COMMENTS