Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. शिवाजी काळे संपादित’ शब्दप्रेरणा’ म्हणजे डॉ.उपाध्ये यांच्या साहित्यप्रेमाचा फुलोरा : प्रा. मंजिरी सोमाणी

श्रीरामपूर : साहित्य म्हणजे जे समाजहित साधते ते लेखन असून डॉ. शिवाजी यांनी संपादित केलेले ’शब्दप्रेरणा’ हे पुस्तक म्हणजे डॉ. बाबुराव उपाध्ये यांच

चितपट कुस्त्यांना मिळाली टाळ्या-शिट्ट्यांची दाद
आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना मानाचा मुजरा
बाळच्या जीवाला नगर व पारनेरला धोका…नाशिकला ठेवा ; वकिलाने केली न्यायालयाकडे मागणी, निर्णयाची प्रतीक्षा

श्रीरामपूर : साहित्य म्हणजे जे समाजहित साधते ते लेखन असून डॉ. शिवाजी यांनी संपादित केलेले ’शब्दप्रेरणा’ हे पुस्तक म्हणजे डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या साहित्यावर अनेक मान्यवरांनी आत्मीयतेने दिलेल्या प्रतिक्रियात्मक दिलेला प्रेमाचा फुलारा होय, असे मत वाचनग्रुपच्या सदस्या प्रा. मंजिरी मदन सोमाणी यांनी व्यक्त केले.
येथील माऊली वृद्धाश्रमातील श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिरात डॉ. शिवाजी काळे यांनी संपादित केलेल्या’ शब्दप्रेरणा’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा माजी प्राचार्य टी. ई. शेळके आणि सेवाभावी पत्रकार बाबासाहेब चेडे यांच्या कार्यगौरवाच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रा. सौ. मंजिरी सोमाणी प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य शंकरराव अनारसे होते. प्रमुख उपस्थिती म्हणून माजी तहसिलदार व शिर्डी विमानतळ भूसंपादन विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी गुलाबराव पादीर, माजी प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे, कोपरगाव येथील नाट्यसंस्थेचे प्रमुख शंकरराव जोर्वेकर, डॉ. मदन सोमाणी, कवी पोपटराव पटारे, डॉ. भास्करराव निफाडे, संतकवी एकनाथ डांगे पाटील, बाळासाहेब बनकर आदी उपस्थित होते. प्रारंभी श्रीविठ्ठल रुक्मिणी मूर्तींचे पूजन करण्यात आले. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी स्वागत करून सर्व मान्यवर पाहुण्यांचा सत्कार केले. सत्कार मूर्तीसह.डॉ. शिवाजी काळे,आसरा प्रकाशनाच्या प्रकाशिका मोहिनी काळे,डॉ. बाबुराव उपाध्ये, यांनी गुलाबराव पादीर यांनी सत्कार केले. प्रा. मंजिरी सोमाणी यांनी पुस्तके ही जीवनाची आनंदबाग फुलवितात, ती नव्या तंत्रयुगात जपली व वाढविली पाहिजे असे सांगून प्राचार्य शेळके म्हणजे शिक्षणक्षेत्रातील अजातशत्रू व्यक्तिमत्व, अनेकांच्या मनातील देवमाणूस अशी प्रतिमा आहे. 83 वर्षाच्या जीवन वाटचालीत त्यांची जनसेवा आणि ज्ञानसेवा सुरू आहे असे सांगून बोरावके कॉलेज मधील आठवणी सांगितल्या. गुलाबराव पादीर यांनी माणुसकीचे नंदनवन असणारे प्राचार्य शेळके आणि ग्रामीण पत्रकारिता जपणारे, 75 वर्षाची जीवनसंघर्ष वाट चालणारे बाबासाहेब चेडे यांचे मोठेपण सांगितले. संतकवी एकनाथ डांगे पाटील यांनी प्राचार्य शेळके एक देवमाणूस कविता सादर केली. प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे,कवी पोपटराव पटारे, प्रा.डॉ.भास्कर निफाडे, बाळासाहेब बनकर, शंकरराव जोर्वेकर यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी सौ. कल्पनाताई वाघुंडे, मुख्याध्यापक दतात्रय चव्हाण,सौ. मंदाकिनी उपाध्ये, आरोग्य मित्र भीमराज बागूल आदी उपस्थित होते. दत्तात्रय खिलारी, शुभम नामेकर, दिनेश जेजुरकर आदीसह आश्रमातील वृद्ध स्त्रीपुरुष, अनाथमुले यांनी कार्यकमाचे नियोजन केले. प्राचार्य शंकरराव अनारसे यांनी अध्यक्षीय भाषणातून शब्दप्रेरणा देणारे डॉ. बाबुराव उपाध्ये डॉ. शिवाजी काळे हे श्रीरामपुरातील साहित्य क्षेत्रातील सेवातपस्वी असल्याचे सांगून प्राचार्य शेळके, बाबासाहेब चेडे यांच्या कार्याचा गौरव केला, हा गौरव त्यांच्या जीवनाची प्रेरणाज्योत असल्याचे सांगितले. हे सेवाभावी कार्य पाहून प्राचार्य शेळके यांनी15 हजार रुपये देणगी रोख दिली तर कोपरगावचे शंकरराव जोर्वेकर यांनी पाच हजार व संतकवी एकनाथ डांगे पाटील यांनी एक हजार रुपये देणगी जाहीर केली. कल्पनाताई वाघुंडे यांनी सप्ताह नियोजनात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन करीत आभार मानले.

COMMENTS