श्रीरामपूर ः येथील साहित्य प्रबोधन मंचचे अध्यक्ष प्रा. डॉ. शिवाजी एकनाथ काळे यांच्या ’देवाची करणी’ या कथेस अमरावती येथील अक्षरवैदर्भी दिवाळी अंक 2

श्रीरामपूर ः येथील साहित्य प्रबोधन मंचचे अध्यक्ष प्रा. डॉ. शिवाजी एकनाथ काळे यांच्या ’देवाची करणी’ या कथेस अमरावती येथील अक्षरवैदर्भी दिवाळी अंक 2025 पुरस्कृत साहित्यकृती पुरस्काराबद्दल अनेकातर्फे अभिनंदन करण्यात आले.
प्रा. डॉ. शिवाजी काळे हे रयत शिक्षण संस्थेच्या राहाता शाखेतून नुकतेच सेवानिवृत्त झाले असून 09 मे 1990 मध्ये स्थापन झालेल्या साहित्य प्रबोधन मंचचे, ते अध्यक्ष आहेत. ना नफा ना तोटा या ध्येयानुसार त्यांनी त्यांच्या आसरा प्रकाशनतर्फे अनेक नवोदित व ज्येष्ठ साहित्यिकांच्या साहित्यकृती प्रकाशित केल्या आहेत. नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथील असलेले डॉ. शिवाजी काळे यांनी बोरावके महाविद्यालयात शिक्षण घेतले 1991 ते 2011 या काळात त्यांनी मुळा प्रवरा वीज संस्थेत कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरी केली. 2011 ते2023 पर्यंत त्यांनी ऐतवडे बु॥ व राहाता शाखेत प्राध्यापक म्हणून सेवा केली.एक प्रभावी गझलकर, साक्षेपी समीक्षक, साहित्यिक म्हणून त्यांचे लेखन दर्जेदार आहे. त्यांच्या ’गावकुसातल्या गोष्टी’, ’साहित्यशिल्प’ असे अनेक ग्रंथ प्रकाशित आहेत. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी ’मराठी ग्रामीण कथा: शोध आणि बोध’ हा त्यांच्यावरील गौरवग्रंथ प्रकाशित केला आहे. गुरुनानक येथे वास्तव्य करीत असलेल्या डॉ. शिवाजी काळे यांनी अनेक पुस्तकांना प्रस्तावना लिहिल्या आहेत. त्यांच्या लेखनास अनेक पुरस्कार लाभले आहेत.

COMMENTS