Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. शशांक कुलकर्णी नीती आयोगाचे कृषी सल्लागार

राहुरी ः महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी, कृषी अभियंता, कृषी धोरण शास्त्रज्ञ व साहित्यिक डॉ शशांक कुलकर्णी यांची भारत सरकारद्वारा

मराठी भाषेचे संवर्धन करायला हवे – डॉ शिवाजी काळे
आर्थिक शिस्त पाळणार्‍या वित्तीय संस्था यशस्वी ः माजी खा. तनपुरे
कर्मवीरांचा आदर्श माऊली वृद्धाश्रमातील कार्यात ः केरू बारहाते

राहुरी ः महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी, कृषी अभियंता, कृषी धोरण शास्त्रज्ञ व साहित्यिक डॉ शशांक कुलकर्णी यांची भारत सरकारद्वारा निती आयोगाचे कृषी व संलग्न विषयाचे सल्लागार म्हणून निवड झाली आहे. नीती आयोग ही भारत सरकारची विकास धोरण ठरवणारी सर्वोच्च संस्था आहे. पंतप्रधान हे नीती आयोगाचे अध्यक्ष असतात.
डॉ. शशांक कुलकर्णी हे कृषी धोरण अभ्यासक असून सद्या इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे शैक्षणिक सल्लागार म्हणून महत्त्वपूर्ण कार्य करत आहेत. त्याचप्रमाणे नवी दिल्ली येथील भारतीय अग्रो इकॉनॉमिक रिसर्च सेंटरच्या गव्हर्निंग काऊन्सिल चे सदस्य आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाचे सिनियर रिसर्च फेलो म्हणून देखील त्यांनी महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली आहे. भारताच्या शेतकरी धोरणाच्या संदर्भात त्यांनी केलेल्या मूलभूत संशोधन कार्याची दखल घेऊन दक्षिण अमेरिकेतील रिपब्लिक ऑफ पनामा या देशातील प्रख्यात स्वाहिली विद्यापीठाने त्यांचा डिलीट प्रदान करून गौरव केला आहे.  त्यांच्या संशोधन आणि लेखन कार्यासाठी त्यांना एकोणीस आंतरराष्ट्रीय व बारा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत . विविध विषयांवर त्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांमध्ये अकरा पुस्तके लिहिली आहेत. त्यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संशोधन जर्नल्समध्ये लेखन केले आहे. त्यांच्या ’स्वामीनाथन कमिशन : ए फाउंडेशन ऑफ फार्मर्स पॉलिसीज इन इंडिया’ या पुस्तकास भारतीय हरित क्रांतीचे जनक प्रो एम एस स्वामीनाथन यांची प्रस्तावना लाभली आहे. स्वामीनाथन आयोगावर लिहिलेले जगातील पहिले व एकमेव पुस्तक म्हणून नॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये या पुस्तकाची नोंद झाली आहे. महाराष्ट्र सरकारने त्यांच्या समन्वयातून समग्रतेकडे या तत्वज्ञानावर आधारित पुस्तकाची नुकतीच शासकीय निवडक ग्रंथ सूचित निवड केली आहे. देशातील सर्वोच्च धोरण संस्थेत झालेल्या या नियुक्तीमुळे समाजातील सर्व थरातून डॉ. कुलकर्णी यांचे अभिनंदन होत आहे.

COMMENTS