Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ.साबळेंच्या निलंबनाने जिल्हा पेटला;लोकप्रतिनिधी गप्प का-एस.एम.युसूफ़

नऊ लोकप्रतिनिधींपैकी जनतेचा आवाज ऐकणारा एकही नाही ?

बीड प्रतिनिधी - जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांच्या निलंबनानंतर सर्वसामान्य जनता पेटून रस्त्यावर आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारों

एकता कपूरला सुप्रीम कोर्टाने फटकारलं
संसदेची सुरक्षा भेदत दोघांनी घातला गोंधळ
समाज कल्याण बीड सौ.के.एस.के.महाविद्यालय,बीडयांच्या संयुक्त विद्यमाने जात वैधता प्रमाणपत्रांचे वितरण संपन्न

बीड प्रतिनिधी – जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांच्या निलंबनानंतर सर्वसामान्य जनता पेटून रस्त्यावर आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारोंच्या संख्येने निलंबनाबद्दल निषेध नोंदवण्यात आला. निलंबनाचे आदेश निघाल्यानंतर तीन दिवस उलटले तरीही बीड जिल्ह्यात असलेले दोन खासदार आणि सात आमदार हे नऊ लोकप्रतिनिधी आजपर्यंत ही मूग गिळून गप्प आहेत. असे का ? नऊ लोकप्रतिनिधींपैकी जनतेचा आवाज ऐकणारा एकही नाही का ? असे संतप्त सवाल मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून उपस्थित केले आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी शल्यचिकित्सकाचे कार्य लोकाभिमुख केले. सामान्यातील सामान्य तळागाळातील फाटका माणूस सुद्धा त्यांना कधीही रुग्णांविषयी बोलू शकत होता. उपचाराबद्दल चर्चा करू शकत होता. कार्यालयात जाऊन त्यांना प्रत्यक्ष भेटू शकत होता. कधीही ते कोणत्याही रुग्णाकरिता तोंड वाकडे करत नव्हते. समोर आलेल्या जबाबदारी पासून तोंड लपवत नव्हते. एकदा रुग्ण जिल्हा रुग्णालयात आला की तो चांगला होऊन सुट्टी होईपर्यंत चांगल्यात चांगले उपचार देण्याचे प्रयत्न करत होते. सर्व डॉक्टर्स, नर्सेस आणि कर्मचार्‍यांकडून व्यवस्थित कार्य करून घेतले. कामचुकारांना सरळ केले. जिल्हा रूग्णालयात कर्ण बधिरांसाठी आधुनिक बेरा मशिन उपलब्ध करून दिली. आमदार व न्यायाधिशांसारख्यांनी त्यांच्याच कार्यकाळात जिल्हा रुग्णालयांमध्ये स्वतः च्या शस्त्रक्रिया करून घेतल्या. माता बाल आरोग्य व लसीकरणात उद्दिष्टापेक्षा अधिक काम करत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. शासकीय नर्सिंग प्रशिक्षण केंद्रात पस्तीस जागा वाढवण्यासाठी प्रयत्न केले. चौतीस विद्यार्थ्यांवर एकाच दिवशी जिभेच्या शस्त्रक्रिया केल्या. दोन नवजात बालकांना दृष्टी मिळवून दिली. आयसीयू कक्ष जिल्हा रूग्णालयात सुरू केले. कधी नव्हे ते दंत शस्त्रक्रिया केल्या. स्पाईन सर्जरी सारखी अवघड शस्त्रक्रिया ही यशस्वी केली. कर्करोगाच्या रुग्णांसाठी केमोथेरपी सुरू केली. टू डी इको व स्ट्रेस टेस्ट मशीन उपलब्ध करून दिली. थॅलेसिमिया, हिमोफिलीया, सिकलसेल निमिया रूग्णांसाठी स्वतंत्र कक्ष सुरू केले. सहा महिन्यात पाच हजार शस्त्रक्रिया केल्या. मराठवाड्यात प्रथमच टोटल हिप रिप्लेसमेंट सर्जरी बीड जिल्हा रूग्णालयातच केली. चौदा बालकांच्या हृदय शस्त्रक्रिया केल्या. दिव्यांग बालकांसाठी क्लब फुट क्लिनिक व डीआयसी विभाग सुरू केला. डायलिसीस कक्ष सुरू केला. एकंदरीत रूग्णसेवा बळकट केली. अजूनही वेगवेगळ्या रोगांच्या उपचारांसाठी वेगवेगळी यंत्र सामग्री व तज्ञ डॉक्टर्स आणण्याचे त्यांचे प्रयत्न सुरूच होते. डॉ. साबळे यांनी स्वतःला रुग्णसेवेकरीता वाहून घेतले होते. अशा जिल्हा शल्य चिकित्सकाबाबत कुठलीही शहानिशा व चौकशी न करता तडकाफडकी निलंबन करण्यात आल्याने आता फक्त बीड शहरच नाही तर संपूर्ण जिल्हाभराच्या कानाकोपर्‍यातून सर्वसामान्य गोरगरीब तळागाळातील नागरिक पेटून उठली आहे. आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारोंच्या संख्येने निषेध आंदोलनही केले. जिल्हा रुग्णालयात त्यांनी केलेले चांगले बदल सर्वसामान्यांना अत्यल्प दरात मिळणारी चांगली सेवा यामुळे जवळपास प्रत्येक बीडकर डॉ. साबळेंसाठी पेटून उठला आहे. असे असताना जिल्ह्यातील खा. रजनीताई पाटील, खा. प्रीतम ताई मुंडे, आ. नमिता ताई मुंदडा, ना. धनंजय मुंडे, आ. संदीप क्षीरसागर, आ. प्रकाश सोळंके, आ. लक्ष्मण पवार, आ. बाळासाहेब आजबे, आ. सुरेश धस जे राज्यसभा, लोकसभा, विधानसभा आणि विधान परिषदेत जनतेचे प्रतिनिधीत्व करत आहेत. या सर्वांना जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून रूग्णांना चांगली सेवा देणार्‍या कर्तव्यदक्ष जिल्हा शल्य चिकित्सकाच्या निलंबनानंतर यापैकी एकानेही डॉ. साबळे यांच्या निलंबनाविरुद्ध चकार शब्द काढला नाही. हे सर्वजण मूग गिळून गप्प का आहेत ? नऊ लोकप्रतिनिधींपैकी जनतेचा आवाज ऐकणारा एकही नाही ? असे सवाल करून या सर्वांचे गप्प बसणे डॉ.  साबळेंवर नाही तर बीड जिल्हावासियांवर अन्याय करणारे असल्याचे मत मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून व्यक्त केले आहे.

COMMENTS