Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आ.डॉ.राहुल आहेर यांनी केली दरेगाव येथे पिकांची पाहणी

  नाशिक प्रतिनिधी - चांदवड तालुक्यातील दरेगाव येथे आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी भेट देत नवनाथ गांगुर्डे यांच्या शेतात जाऊन  पिकांची पाहणी केली

जुनच्या मध्यावर पाणी परिषदेचे आयोजन : डॉ. भारत पाटणकर
‘काढा तण – वाचवा वन’ या ऐतिहासिक अभियानास” अहमदनगर जिल्ह्यात सुरूवात
सरकारी नोकर्‍यांमध्ये कंत्राटी पध्दतीने नोकर भरतीचा दुर्भाग्यपूर्ण निर्णय : आ. पृथ्वीराज चव्हाण

  नाशिक प्रतिनिधी – चांदवड तालुक्यातील दरेगाव येथे आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी भेट देत नवनाथ गांगुर्डे यांच्या शेतात जाऊन  पिकांची पाहणी केली. दरेगाव व परिसरात मका भुईमूग बाजरी कांदा रोपे व इतर  पिकांचे पूर्णपणे नुकसान झाले असून पिण्याच्या पाण्याचीही मोठ्या प्रमाणावर टंचाई निर्माण झाली आहे. शासकीय अधिकाऱ्यांसमवेत डॉ. राहुल आहेर यांनी पिकांची पाहणी केली. कृषी विभाग, महसूल विभाग, पंचायत समितीचे अधिकारी व विमा कंपन्यांच्या अधिकारी यावेळेस उपस्थित होते.दरेगाव ग्रामपंचायततर्फे आ. आहेर यांना निवेदन देण्यात आले. यात दरेगाव येथील सर्व वाडी वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याचा  टँकर सुरू करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली तसेच , त्याचप्रमाणे गावात पशु व पक्षांसाठी पानवठे तयार करावेत ,जलजीवन मिशन अंतर्गत वागदर्डी धरणालगत विहरीसाठी जागा  उपलब्ध करून द्यावी, खंडेराव मंदिराजवळील बंधाऱ्याच्या गाळ काढण्यात यावा. ओझरखेड योजनेचे पाणी दरेगाव पर्यंत सोडण्यात यावे. गतवर्षी झालेल्या पिकांची नुकसान भरपाई बहुतांश शेतकऱ्यांना अद्यापही मिळालेली नाही तसेच  अनेक शेतकऱ्यांचे पंचनाम्यात नावे आढळून येत नाही अशां राहिलेला सर्व लोकांना नुकसान भरपाई अनुदान मिळवून देण्यात यावे. गावात रोजगार हमी योजनेअंतर्गत पानंद रस्ते व इतर रस्त्यांच्या कामांना मंजुरी देण्यात यावी या अशाच निवेदन ग्रामपंचायत तर्फे देण्यात आले. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष मनोज शिंदे, माजी सभापती नितिन गांगुर्डे, शांताराम भवर, कु. ऊ. बा. संचालक पंढरीनाथ खताळ, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष गीताताई झाल्टे,  डॉ. भावराव देवरे, किरण बोरसे, गणपत ठाकरे, गटविकास अधिकारी श्रीमती लाड, तालुका कृषी अधिकारी विलास सोनवणे, नायब तहसीलदार खेडकर, विस्तार अधिकारी लोहार, विमा कंपनीचे शेवाळे,डोनगाव सरपंच गोकुळ वाघ, वाद सरपंच प्रविण आहेर, अंबादास ठोबरे, रोहित अहिरे, उपसरपंच सोमनाथ देवरे, माजी सरपंच नथू देवरे, माजी चेअरमन संजय गांगुर्डे, विक्रम देवरे ,समाधान देवरे, अनिल गव्हाणे, निवृत्ती अहिरे,रतन गांगुर्डे, सोमनाथ देवरे, सुकदेव गांगुर्डे, ग्रामसेवक मल्ले, कूषी सहायक निरभवने,  नवनाथ गांगुर्डे, भावराव गांगुर्डे, विक्रम पगार, नवनाथ पगार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

COMMENTS