डॉ. पोखरणांच्या अटकपूर्व जामीनावर आज सुनावणी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. पोखरणांच्या अटकपूर्व जामीनावर आज सुनावणी

अहमदनगर/प्रतिनिधी : जिल्हा रुग्णालय जळीत प्रकरणासंदर्भामध्ये निलंबित जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांचे दोन वेळा जबाब घेण्यात आले आहे. तसेच त

चित्रकला स्पर्धा उद्योन्मुख चित्रकारांसाठी उत्तम व्यासपीठ ः आ. काळे
साखर कामगार पतपेढीच्या अध्यक्षपदी तिपायले
रात गेली हिशेबात, पोरगं नाही नशिबात; पडळकरांची शरद पवारांवर टीका| सुपरफास्ट महाराष्ट्र | LokNews24 |

अहमदनगर/प्रतिनिधी : जिल्हा रुग्णालय जळीत प्रकरणासंदर्भामध्ये निलंबित जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांचे दोन वेळा जबाब घेण्यात आले आहे. तसेच त्यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या प्रकरणात शिवसेना उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव यांनी हस्तक्षेप अर्ज दाखल केला असून, त्यावर आज मंगळवारी (23 नोव्हेंबर) सुनावणी होणार असून याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला नेमकी आग कशामुळे लागली, याचा अहवाल देण्याबाबत विद्युत विभागाला चार लेखी पत्र देण्यात आले असून अद्यापपर्यंत त्यांचे उत्तर आलेले नाही, अशी माहिती तपासी अधिकारी संदीप मिटके यांनी दिली.
नगर जिल्हा रुग्णालयाच्या जळीत हत्याकांड प्रकरणाला आता सोळा दिवस उलटून गेले आहेत. राज्य सरकारने स्वतंत्र समिती नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अधिपत्याखाली नेमली आहे. त्या समितीने नगर येथे येऊन अनेकांचे जबाब सुद्धा या अगोदर घेतलेले आहेत. दोन दिवस समितीने या ठिकाणी सर्व माहिती गोळा केलेली आहे तर दुसरीकडे जिल्हा रुग्णालयाच्या जळीत प्रकरणासंदर्भामध्ये जिल्हा पोलिस प्रशासनाने येथील तोफखाना पोलिस ठाण्यामध्ये पोलिसांच्यावतीने गुन्हा दाखल केलेला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या अधिपत्याखाली या घटनेचा तपास सुरू आहे. या घटनांमध्ये प्रथमदर्शनी जे दोषी आढळलेले आहेत, त्या चार महिलांना अटक करण्यात आली व त्यांना नंतर जामीनही मंजूर करण्यात आलेले आहेत.
या प्रकरणासंदर्भामध्ये आता न्यायालयामध्ये दिनांक 23 नोव्हेंबर रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे. डॉ. पोखरणा यांना अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्यात आलेला असून याला शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी यामध्ये आक्षेप घेत आमचे म्हणणे ऐकून घ्यावे मग त्यांच्या जामीनाबाबत विचार करावा, असे म्हटले असून या सर्व प्रकरणाची सुनावणी मंगळवारी होणार आहे. जिल्हा पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केल्यानंतर आत्तापर्यंत बारा जणांचे जबाब घेतले असून तीन जणांचे 164 प्रमाणे जबाब घेतले आहेत.

अहवाल अजूनही नाही
वास्तविक पाहता ज्यामुळे आग लागली त्या महावितरणाचा तसेच विद्युत निरीक्षकांच्या संदर्भातला अहवाल येणे अद्याप बाकी आहे. तपासी अधिकारी मिटके यांनी यासंदर्भात पत्र दिलेले आहे मात्र अद्यापपर्यंत या संदर्भामध्ये कोणताही अहवाल येथील पोलिस प्रशासनाला प्राप्त झालेला नाही. आम्ही या संदर्भामध्ये चार वेळा पत्र देऊन त्यांचा अहवाल मागविला असल्याचे तपासी अधिकारी मिटके यांनी सांगितले. तर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पोखरणा यांची आम्ही चौकशी सुरू केलेली आहे. त्यांचे दोन वेळा जबाब सुद्धा घेतले असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकारने जी स्वतंत्र समिती नेमली आहे, त्या समितीने सर्व माहिती घेतली आहे तसेच अनेकांची जबाब सुद्धा घेतलेले आहेत. सात दिवसाच्या आत अहवाल दिला जाईल, असे त्या वेळेला विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले होते. आता या घटनेला 16 दिवस उलटून गेले तरीही अद्यापपर्यंत कोणताच अहवाल गेला नाही त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची शंका आता निर्माण होऊ लागली आहे. राज्य सरकारला अहवाल केव्हा जाणार, यामध्ये काय स्पष्टता असणार आहे हे सुद्धा पाहणे यामुळे महत्त्वाचे ठरणार आहे.

COMMENTS