Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ.ज्योतीताई मेटे यांचा सत्कार संपन्न

वडवणी प्रतिनिधी - डॉ. ज्योतीताई विनायकराव मेटे यांची नुकतीच पदोन्नतीने अपर निबंधक, महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था पुणे या पदावर नियुक्ती झाली. या

मीरा भाईंदरचे आयुक्त ईडीच्या रडारवर
बांगलादेशचे खासदार भारतातून बेपत्त्ता
वरखेड यात्रा नियोजनासाठी उद्या नगरला होणार बैठक

वडवणी प्रतिनिधी – डॉ. ज्योतीताई विनायकराव मेटे यांची नुकतीच पदोन्नतीने अपर निबंधक, महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था पुणे या पदावर नियुक्ती झाली. या पदावर पोचणार्‍या डॉ. मेटे या आतापर्यंतच्या इतिहासात मराठावाड्यातल्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. तर, महाराष्ट्रातून देखील त्यांचा दुसरा क्रमांक आहे. यापूर्वी या पदावर केवळ ज्योती कुंबला यांनी या पदावर काम केले होते. म्हणजे डॉ. ज्योतीताई मेटे या पदापर्यंत जाणार्‍या राज्यातल्या दुसर्‍या आणि मराठवाड्यातल्या एकमेव महिला अधिकारी ठरल्या आहेत. याबद्दल , बीड शहरातील नाना युथ फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष, तथा केतुरा गावचे विद्यमान सरपंच, परमेश्वर नाना तळेकर यांच्या निवासस्थानी, डॉ, ज्योतीताई विनायकराव मेटे लाटकर आल्या असता, त्यांचा सत्कार करताना,  केतुरा येथील सरपंच परमेश्वर नाना तळेकर, युवा पत्रकार अंकुश गवळी, नारायण काशीद, मनोज जाधव, पांडुरंग बहीर, माजी सभापती  ज्ञानेश्वर कोकाटे, अनिल घुमरे, अमोल करे, नारायण चिकने, कृष्णा माने, पवन शेळके, याप्रसंगी मराठवाडा अभ्यासकेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते, व डॉ, ज्योतीताई विनायकराव मेटे यांनी विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले,

COMMENTS