Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना पदवीदान

वर्धा प्रतिनिधी -  सावंगी मेघे येथील दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठाचा १४ वा दीक्षान्त समारोह आज आयोजित करण्यात आला होता

Jalna : पिंजारी समाज बांधवांची संघटन बैठक (Video)
महाराष्ट्रासह पाच राज्यात कोरोनाची लाट कायम
कुंभमेळ्यात शिरला कोरोना ; विस्फोटाची शक्यता; देशात घरोघर जाऊन कोरोनाचे लसीकरण

वर्धा प्रतिनिधी –  सावंगी मेघे येथील दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठाचा १४ वा दीक्षान्त समारोह आज आयोजित करण्यात आला होता. या समारोहाला भारत सरकारचे वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत विद्यापीठाचे कुलपती दत्ता मेघे स्नातक व स्नातकोत्तर विद्यार्थ्यांना पदवी व पुरस्कार प्रदान केले. या समारोहात सोलर इंडस्ट्रीज इंडियाचे संस्थापक अध्यक्ष सत्यनारायण नुवाल या विदर्भभूमीपुत्रास डीलिट म्हणजेच डॉक्टर ऑफ लिटरेचर या मानद पदवीने सन्मानित करण्यात आले. विद्यापीठ सभागृहात आयोजित दीक्षान्त समारोहाच्या अध्यक्षस्थानी कुलपती दत्ता मेघे उपस्थित होते मंचावर विशेष अतिथी  डॉ. भागवत कराड यांच्यासह प्रकुलपती डाॅ. वेदप्रकाश मिश्रा, कुलगुरू डॉ. ललित वाघमारे, प्रकुलगुरू डॉ. गौरव मिश्रा, विद्यापीठाचे प्रधान सल्लागार सागर मेघे, आमदार समीर मेघे, कराड येथील कृष्णा आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. नीलम मिश्रा, व्यवस्थापन मंडळ सदस्य अनिल पारेख, अशोक चांडक, डाॅ. अभ्युदय मेघे, डॉ. राजीव बोरले, डॉ. संदीप श्रीवास्तव, डॉ. अनुप मरार, डाॅ. मीनल चौधरी, कुलसचिव डॉ. श्वेता काळे पिसुळकर, रवि मेघे, डॉ. तृप्ती वाघमारे, मनीष वैद्य, डॉ. एस. एस. पटेल, डॉ. अमित गुडधे, अधिष्ठाता डाॅ. सुनीता वाघ, डॉ. विद्या लोहे, डॉ. जहीर काझी, डॉ. प्रियांका जयस्वाल, डाॅ. के.टी.व्ही. रेड्डी, डाॅ. राजू गणेश सुंदर, ब्रजेश लोहिया, डॉ. चित्र ढवळे, डॉ. पल्लवी डायगव्हाणे, डॉ. शुभदा गाडे, डॉ. दीपक खोब्रागडे, डॉ. अनिता वंजारी, डॉ. जया गवई, डॉ. इर्शाद कुरेशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

COMMENTS