Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. गाडेकर धन्वंतरी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. स्वाधीन गाडेकर

शिर्डी प्रतिनिधी ः राज्यात स्वच्छ पारदर्शी व आर्थिक शिस्तीचा आदर्श देणारी सहकारात अहमदनगर जिल्ह्यात अग्रणी मानल्या जाणार्‍या राहाता तालुक्यातील ड

BREAKING: देवेंद्र फडणवीसवर गुन्हा दाखल | LokNews24
उद्यापासून रेमडेसिवीरचा पुरवठा होणार | पहा ‘सुपरफास्ट महाराष्ट्र’ | Lok News24
हातचलाखीने बदलले कार्ड, खात्यातून काढले 43 हजार

शिर्डी प्रतिनिधी ः राज्यात स्वच्छ पारदर्शी व आर्थिक शिस्तीचा आदर्श देणारी सहकारात अहमदनगर जिल्ह्यात अग्रणी मानल्या जाणार्‍या राहाता तालुक्यातील डॉ. के. वाय. गाडेकर धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. स्वाधीन गाडेकर यांची तर उपाध्यक्षपदी नानासाहेब बोठे यांची बिनविरोध निवड झाली. डॉ. के. वाय. गाडेकर धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक पतसंस्थेचे संस्थापक माजी नगराध्यक्ष डॉ. के. वाय. गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच बिनविरोध पार पडली. त्यानंतर संस्थेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडीही  बिनविरोध झाल्या. संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. स्वाधीन गाडेकर व उपाध्यक्षपदी नानासाहेब बोठे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून  एस. एस. कोठुळे यांनी कामकाज पाहिले. त्यांना व्यवस्थापक अरुण मेहेत्रे व शाखाधिकारी राधाकिसन भुजबळ यांनी मदत केली. यावेळी नवनिर्वाचित संचालक डॉ. किसनराव यादवराव गाडेकर, यशवंत जानबा मेहेत्रे, डॉ. विजयकुमार भागचंद बाकलीवाल,  मच्छिंद्र गंगाधर निधाने, विलास कुंडलिक अंत्रे, डॉ. शरद मुक्ताजी वाघमारे, डॉ. शिल्पा राहुल गाडेकर, संगीता सुभाष म्हसे, अँड. धनराज रामराव चितळकर यांची निवड करण्यात आली. यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी एस. एस. कोठूळे, नुतन अध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर व उपाध्यक्ष नानासाहेब बोठे यांच्या सह सर्व संचालकांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना डॉ. स्वाधीन गाडेकर म्हणाले की, गेल्या 29 वर्षात संस्थेने अनेक छोट्या मोठ्या व्यवसायिकांना पाठबळ देत आर्थिक दृष्ट्या प्रगत करण्यात मोठा हातभार लावला आहे राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे संस्थेला नेहमीच अनमोल असे मार्गदर्शन असते तसेच खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील यांचे पाठबळ व सहकार्य संस्थेला वेळोवेळी लाभत असते त्यामुळे संस्था यशाच्या शिखरावर वाटचाल करीत आहे. संस्थेचे सर्व संचालक मंडळ तसेच मार्गदर्शक हितचिंतक व कर्मचारी सेवक वर्ग यांचा यामध्ये मोठा मोलाचा वाटा आहे  संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध पार पाडल्याबद्दल सर्व आजी-माजी संचालक व सभासद यांचे यावेळी नूतन चेअरमन डॉक्टर स्वाधीन गाडेकर यांनी आभार मानले. संस्थेचे संस्थापक डॉ. के. वाय. गाडेकर म्हणाले की, पतसंस्था आजतागायात अनेक चढ-उतार पार करीत या ठिकाणी पोहोचली आहे. यामध्ये संस्थेचे सर्व संचालक,सभासद, ठेवीदार,कर्जदार आणि विशेषतः कर्मचारी वृंद यांचे मोठे योगदान आहे. यावेळी नामदेव उंडे, केतन जेजुरकर, मीनाक्षी जेजुरकर, अमोल गायकवाड, रोहन गाडेकर, साई मंडलिक, हेमा कुलकर्णी, वसुधा तुपे आदी उपस्थित होते. नूतन उपाध्यक्ष नानासाहेब बोठे यांनी आभार मानले व सुभाष म्हसे यांनी सूत्र संचालन केले. या नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच संचालक मंडळाचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील,खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.

COMMENTS