Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. जुनागडे यांच्या उपराचाने टळली ‘बोन मॅरो ट्रान्सप्लँट’  

दोनच महिन्यात रुग्ण ठणठणीत

नाशिक : रक्तपेशी आणि प्लेटलेटस कमी असणार्‍या तरुणाला पुण्यातील नामांकित रुग्णालयातील डॉक्टरांनी ‘बोन मॅरो ट्रान्सप्लँट’चा सल्ला दिला. लाखो रुपयां

‘बेटी बचाव बेटी पढाओ’ शिल्प प्रेरणादायी ठरेल : राज्यमंत्री आदिती तटकरे
डॉ. तात्याराव लहाने यांचा राजीनामा मंजूर
शिक्रापूरजवळील अपघातात पाच जणांचा मृत्यू | DAINIK LOKMNTHAN

नाशिक : रक्तपेशी आणि प्लेटलेटस कमी असणार्‍या तरुणाला पुण्यातील नामांकित रुग्णालयातील डॉक्टरांनी ‘बोन मॅरो ट्रान्सप्लँट’चा सल्ला दिला. लाखो रुपयांची ट्रान्सप्लँटची तयारीही झाली. मात्र सेंकड ओपिनियन म्हणून रुग्ण रक्तविकार तसेच बोन मॅरो तज्ज्ञ  डॉ. प्रितेश जुनागडे यांच्या लोटस हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. येथील उपचारांनी तरुणाची बोन मॅरो ट्रान्सप्लँट तर टळलीच शिवाय तो दोनच महिन्यात रक्त आजारापासून मुक्त होऊन ठणठणीत बराही झाला.  सविस्तर माहिती अशी की, नंदुरबार येथील रहिवासी २८ वर्षीय तरुणाच्या शरीरात लाल, पांढर्‍या रक्तपेशींसह प्लेटलेटस् कमी आहेत आणि त्यामुळे रक्त तयार होत नसल्याचा आजाराचे निदान करण्यात आले.  पुण्यातील नामांकित हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर गेल्या ८ वर्षांपासून उपचार सुरू होते. त्याच्या शरीरात रक्त तयार होत नाही असे चुकिचे निदान केल्यानंतर त्यासाठी त्याला वारंवार रक्त चढवावे लागे.   विविध प्रकारच्या गोळ्या औषधींचे उपचार घेऊनही रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हतीच परंतु वारंवार रक्त चढवल्यामुळे त्याच्या शरीरात लोहाचे अतिरिक्त प्रमाण वाढल्याने इतर समस्या, आजारांचा त्रास वाढला.  वारंवार रक्त देऊनही तरुणाचा आजारावर तिळमात्र आराम पडला नाही, अखेर पुण्यातील याच नामांकित रुग्णालयातील डॉक्टरांनी या रुग्णाचे बोन मॅरो ट्रान्सप्लँट करण्याचे ठरवले. त्यासाठी त्याच्या सख्ख्या मोठ्या बहिणीचे रक्तपेशी घेण्याचे ठरले. चाचणी नंतर रुग्णाच्या रक्तपेशी डोनर बहिणीच्या रक्तपेशींशी केवळ ५० टक्के इतक्याच जुळतात असे दिसून आले. या स्थितीस हॅप्लो असे संबोधले जात असून त्यामुळे रुग्णांचा खर्चही दुप्पटीने वाढतो.  रुग्णाचा उपचार खर्च आवाक्याबाहेर जात असूनही पुण्यात बॉन मॅरो ट्रान्सप्लँटची तारीखही ठरली.  दरम्यान, रुग्णांच्या नातेवाईंकांनी नाशिक येथील डॉ. प्रितेश जुनागडे यांचे सेंकड ओपनियन घेण्याचे ठरवले. डॉ. प्रितेश यांनी स्वत: नव्याने या रुग्णाची बोन मॅरो चाचणी केली आणि अचूक निदानही केले.(लोटस हॉस्पिटलचे हेच यूएसपी असून साधारणत: रक्तचाचणी करणारे वेगळे असतात आणि निदान, उपचार करणारे तज्ज्ञ डॉक्टर वेगळे असतात.) बोन मॅरो प्रत्यारोपण करण्यापूर्वी डॉ जुनागडे यांनी रुग्णांवर इंजेक्शनसह औषधोपचार सुरू केले. डॉक्टरांचा अनुभव, ज्ञानाचा काय हा हातगुण..! अवघ्या दोनच महिन्यात रुग्णाने उपचारास प्रसिसाद दिला. त्यानंतर रुग्णाला रक्त तर चढवावे लागले नाहीच, शिवाय बोन मॅरो प्रत्यारोपणही टळले. आज रुग्णाला नवजीवन मिळाले आहे. बोन मॅरो तज्ज्ञ डॉ. प्रितेश जुनागडे यांचे अचूक निदान, उपचाराने रुग्ण आज पूर्णपणे रक्ताच्या आजारापासून मुक्त झाला. आता भविष्यात त्याला कधीही रक्त चढवावे लागणार नाही अथवा अशा रक्तपेशीचे प्रत्यारोपणही करावे लागणार नाही, हे विशेष.! ‘रुग्ण डॉक्टरांना देव माणूस का मानतात हे या केसवरुन सिद्ध होते,’ असे तो रुग्ण सांगत आहे. रुग्ण आणि त्याच्या परिवारासाठी आज डॉ. जुनागडे देवमाणसापेक्षा कमी नाहीत.!                                                                                                                                                                

बोन मॅरो चाचणी अन् नव्याने निदान, उपचार – संबंधित रुग्णाच्या शरीरात रक्त तयार होत नाही असे निदान पहिल्यांदा केले गेले. रुग्णाला वारंवार रक्त चढवून त्याच्या शरीरातील लोहाचे प्रमाण अत्याधिक वाढल्याने इतर आजार, समस्या निर्माण झाल्या. ५० टक्के जुळणार्‍या रक्तपेशी रुग्णाच्या शरीरात प्रत्यारोपित करण्याच्या स्थितीला वैद्यकीय परिभाषेत ‘हॅप्लो’  म्हणतात. त्यातून गुंगागुंत निर्माण होऊ शकते. मी स्वत: बोन मॅरो चाचणी करुन नव्याने निदान केले आणि रुग्ण दोनच महिन्यात ठणठणीत बरा झाला. 

COMMENTS