अहमदनगर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी अहमदनगर शहरातील बौद्ध संस्कार संघाकडून रविवारी 14 एप्रिल

अहमदनगर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी अहमदनगर शहरातील बौद्ध संस्कार संघाकडून रविवारी 14 एप्रिल रोजी पहाटे 5 वाजता भीम पहाट कार्यक्रमाचे आयोजन चेतना लॉन मंगल कार्यालय, अहमदनगर-संभाजीनगर रोड येथे करण्यात आल्याची माहिती भीम पहाट कार्यक्रमाचे आयोजक बौद्धाचार्य भाऊसाहेब देठे यांनी दिली आहे. भीम-पहाट या कार्यक्रमाचे यंदा 16 वे वर्ष असून, हा कार्यक्रम दरवर्षी उत्साहात साजरा करण्यात येतो. यंदाही या भीम-पहाट कार्यक्रमाची सुरूवात पहाटे 5 वाजता हाणेार असून, यानिमित्त सुमधूर भीम-गीतांची भीममय पहाट कार्यक्रमासाठी ऑके्रस्टा संगीत सितारे परिवार यांचा असणार आहे. तरी या भीमपहाट कार्यक्रमांच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा जागर या भीमगीतांतून होणार असून, त्याचा लाभ घेण्याचे आवाहन भाऊसाहेब देठे यांनी केले आहे.
COMMENTS