अहिल्यानगर : आधुनिक माहिती व तंत्रज्ञानाचा वेग कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून काळाच्या शेकडो पट पुढे आहे.रोबोटिक्स,आयसीटी सॉफ्ट स्किल्स,ॲप-वे
अहिल्यानगर : आधुनिक माहिती व तंत्रज्ञानाचा वेग कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून काळाच्या शेकडो पट पुढे आहे.रोबोटिक्स,आयसीटी सॉफ्ट स्किल्स,ॲप-वेब डिझाईनिंग आणि कोडींग ही नव्या युगाची शस्त्रे आहेत.वर्तमान काळात जवळजवळ सर्वांनाच याची प्राथमिक का होईना माहिती असणे प्रचंड गरजेचे झालेले आहे.डॉ बागुल यांचा या गोष्टींबद्दल प्राथमिक माहिती देणारा “रोड टू कोड” हा उपक्रम शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांसाठी खरोखरच उपयुक्त आहे .”असे प्रतिपादन युनोस्को-आशियाचे प्रादेशिक संचालक टीम कुर्टीस यांनी केले.
हैदराबाद येथील भारतातील पहिले प्रोटोटाइप सेंटर असलेल्या टी वर्क येथे संपन्न झालेल्या युनेस्को,इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय,भारत सरकार तसेच डिजिटल इंडियाच्या इंडिया एआय मिशन तसेच उदयोन्मुख तंत्रज्ञान ,आयटीईएससी विभाग,तेलंगाना सरकारच्या वतीने आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित तिसऱ्या ए आय रॅम परिषदेत शिक्षक डॉ.अमोल बागुल यांच्या ” रोड टू कोड ” या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित उपक्रमाच्या वेबपेज विमोचनप्रसंगी श्री कुर्टीस बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणूनश्री अभिषेक सिंग(अतिरिक्त सचिव, Meit आणि CEO, IndiaAl मिशन),जेम्स राईट( युनेस्को-कार्यक्रम विशेषज्ञ), श्रद्धा शर्मा(संस्थापक आणि सीईओ, युअरस्टोरी मेडीया), कविता भाटिया (सीओओ, इंडिया AI मिशन आणि ग्रुप कोऑर्डिनेटर, इमर्जिंग टेक्नॉलॉजीज डिव्हिजन, एमईआयटीवाय), डॉ.कृष्णाश्री अच्युतन (पीजी प्रोग्राम्सचे डीन,अमृता विश्व विद्यापीठाचे स्कूल ऑफ इंजिनियरिंग), रमादेवी लंका(संचालक, इमर्जिंग टेक्नॉलॉजीज, तेलंगणा सरकार),डॉ. प्रीती बंजल( सल्लागार/भारत सरकारच्या प्रधान वैज्ञानिक सल्लागार शास्त्रज्ञ)आदी उपस्थित होते.ए आय विषयक साहित्याची किट प्रदान करून डॉ.बागुल यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
कोडींगचा उपयोग करून वेबसाईट-ॲप-गेम्स निर्मिती,माहिती विश्लेषण तसेच तंत्रज्ञानाच्या विविध गोष्टींसाठी केला जातो.डॉ.बागुल यांच्या बागुगल वेबसाईटच्या ‘माय-एआय’ या नाविन्यपूर्ण स्टार्टअप संकल्पनेतील रोड टू कोड या उपक्रमात जगभरातील कोडींगविषयक कार्य करणाऱ्या संस्था,व्यक्ती,तज्ञ,उपक्रम, प्रणाली यांचा डाटाबेस,वापरकर्त्याच्या गरजेनुसार उपलब्ध होणाऱ्या कोडींगच्या विविध सुविधा,विद्यार्थी, शिक्षक व पालकांसाठी अध्ययन अध्यापनाच्या वैशिष्ट्यपूर्ण कोडींग पद्धती,दैनंदिन जागतिक कोडींग घडामोडी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
COMMENTS