श्रीरामपूर : माझे भाऊदादा प्रा.डॉ. बाबुराव उपाध्ये यांची सर्व पुस्तके मी वाचली असून आमच्या घरात आणि परिवारात त्यांच्या पुस्तकांचे मनापासून वाचन क
श्रीरामपूर : माझे भाऊदादा प्रा.डॉ. बाबुराव उपाध्ये यांची सर्व पुस्तके मी वाचली असून आमच्या घरात आणि परिवारात त्यांच्या पुस्तकांचे मनापासून वाचन करतो. त्यांची पुस्तके भक्ती व नीतीचे संस्कार देतात, त्यामुळे आमच्या व नातेवाईकांच्या घरातील लहानापासून थोरापर्यंत सर्वजण सदैव उत्तम नागरिक म्हणून वागतात असे उत्स्फूर्त विचार ओझर येथील कुंभार समाजाच्या कार्यकर्त्या मीराताई बागूल यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर येथील ग्रंथालय वाचनालयातील विविध ग्रंथ पाहताना, वाचताना त्यांनी आनंद व्यक्त केला. वाचन संस्कृती प्रतिष्ठानची वाचन चळवळ गावोगावी, घरीदारी आणि कुटुंबाकुटुंबात सुरू केल्याबद्दल मीराताई बागूल यांनी मंदाकिनी उपाध्ये, गणेशानंद उपाध्ये, आरती उपाध्ये यांचे कौतुक करून डॉ. उपाध्येसह सर्वांचा सन्मान केला, यावेळी ओझर येथील व्यापारी दुकानदार व कुंभार समाजाचे कार्यकर्ते अशोकराव बागूल, कोपरगाव येथील वीट कारखानदार बाळासाहेब उपाध्ये यांनीही वाचन संस्कृती चळवळीचे कौतुक केले. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी स्वागत, प्रास्ताविक करून विविध पुस्तके देऊन सन्मान केला. यावेळी स्व. संतराम त्रिंबक सैंदोरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. सौ. मीराताई बागूल यांनी डॉ. बाबुराव उपाध्ये यांचा1995 चा पहिला कवितासंग्रह’ निवडुंगाची फुलं’ पासून नुकतेच प्रकाशित झालेल्या’ दिव्यत्वाचे चिंतन’,’ साहित्याचे नंदादीप’ अशा 51 पुस्तकांच्या निर्मितीबद्दल कौतुक केले,’ भारतीय कुंभार समाजातील संत’ या पुस्तकाचे विशेष कौतुक केले. श्रीरामपूर शहरात असे साहित्यिक राहतात, कुंभार समाजातील अशा साहित्यिकांचा सार्थ अभिमान वाटतो, असे सांगून नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील भारम- कोळम हे आमचे, डॉ. उपाध्ये यांचे मूळ गाव आहे, त्यांचे बालपण व प्राथमिक शिक्षण मामाच्या गावी म्हणजे श्रीरामपूर तालुक्यातील उंदीरगाव येथे झाले तर उच्च शिक्षण श्रीरामपूरला झाले. बालपणापासून वाचन, लेखन करणारे डॉ. उपाध्ये यांचा आम्हाला सार्थ गौरव वाटतो असे विचार सौ. मीराताई बागूल यांनी व्यक्त केले. आरती उपाध्ये यांनी आभार मानले.
COMMENTS