Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उस्माननगर येथे डॉ.बाबासाहेब  आंबेडकर जयंतीचे आयोजन

उस्माननगर प्रतिनिधी - भारतीय घटनेचे शिल्पकार  ,महामानव, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वा जन्मोत्सव नागवंशी बुद्ध विहार उस्माननगर  त

सार्वजनिक बांधकाम विभाग नवनिर्मिती अणि सृजनशीलतेचे दुसरे नाव
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्यासाठी हालचाली; सुसंवादासाठी प्रयत्न सुरु असल्याची शरद पवारांची माहिती
सोलापूर-कुर्डूवाडी मार्गातील गेट नंबर 45 बंद  

उस्माननगर प्रतिनिधी – भारतीय घटनेचे शिल्पकार  ,महामानव, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वा जन्मोत्सव नागवंशी बुद्ध विहार उस्माननगर  ता.कंधार  येथे 24 एप्रिल 2023 रोज  सोमवारी  सोहळ्याचे आयोजन  करण्यात  आले आहे.   तथागत गौतम बुद्ध  व डॉ.बाबासाहेब  आंबेडकर   यांच्या प्रतिमेचे पूजन  पुष्पहार  अर्पण करून
सकाळी 10.35 वाजता  पंचशिल  ध्वजाचे ध्वजारोहन मा श्री शिवाभाऊ  नरंगले ( वंचित बहुजन आघाडी  दक्षिण  जिल्हाध्यक्ष  नांदेड  ) यांच्या हस्ते होणार  आहे.यावेळी प्रमुख  पाहूणे म्हणून  मा.पी.डी.भारती ( सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन  उस्माननगर) ,सौ.डी.ए.शिंदे ( ग्राम वि.अधिकारी उस्माननगर ),मा.तु.श.वारकड गुरूजी ( माजी सरपंच  उस्माननगर ),जयवंतराव काळे (राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक  जि.प.के.प्राथमिक शाळा उस्माननगर  ),अ‍ॅड. प्रशांत कांबळे ( उस्माननगर  ),वैद्यकीय  अधिकरारी ( प्रा.आरोग्य  केंद्र  उस्माननगर  ),मा.श्री.गोविंद  बोदेमवाड (  प्राचार्य समता मा.व.उच्च माध्यमिक वि.उस्माननगर ) ,मा.राहूल सोनसळे( मुख्याध्यापक  सम्राट अशोक प्राथमिक  शाळा उस्माननगर  ),अमिनशाह खय्युमशाह फकिर ( मा.सरपंच  प्रतिनिधी )हे उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख उपस्थितीत श्रीमती गयाबाई शंकरराव  घोरबांड ( सरपंच  ग्रामपंचायत  कार्यालय  उस्माननगर),शेख  बाशीद नबिसाब ( उपसरपंच  ),रब्बाना काशिमशाह पकिर ,सौ.संगीता विजय  भिसे,शिवशंकर  मुकुंद काळे,अंगुलीमाल  गोविंद  सोनसळे ,कमलाकर  नागोराव पाटील  शिंदे ,सौ.रेखा गंगाधर  भिसे,रूद्र ( संजय ) रामकिशन वारकड ( चेअरमन  तथा ग्रामपंचायत  सदस्य  ),नारायण  घोरबांड, जुबेदाबी मोहम्मद शरिफ पिंजारी,खाजाबी शौकत शेख,विश्वांभर  मोरे ( पोलीस पाटील) ,अशोक  गोविंद काळम ( सामाजिक  कार्यकर्ते  ) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित  राहणार  आहेत. तर दुपारी ठिक तीन वाजता गावातील प्रमुख  रस्याने भगवान गौतम बुद्ध व बोधिसत्व, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक  काढण्यात येणार  आहे .तरि पंचक्रोशीतील भिम सैनिक, भिम आनुयायी,बौद्ध उपासक, उपासिका, गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर  जन्मोत्सव  सोहळ्यात  सहभागी होऊन  कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन  भिमजयंती मंडळाचे  स्वप्नील  गंगाधर  कांबळे( अध्यक्ष  ),राहुल  किशन  सोनसळे(उपाध्यक्ष  ),अभिजित  सोनसळे  ,सचिन  सोनसळे ,क्रांतीकिरण सोनसळे,  लखन मधुकर  सोनसळे, धम्मानंद  कांबळे व नागवंश भिमजयंती मंडळ उस्माननगर  यांनी सर्व  गावकरी मंडळींनी आवाहान  केले आहे.

COMMENTS