Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. विशाल गुंजाळ यांची महाराष्ट्र आय एम ए च्या पदाधिकारी म्हणुन नियुक्ती

नाशिक प्रतिनिधी - इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक शाखेचे अध्यक्ष डॉ. विशाल गुंजाळ यांची इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य येथे सहसचिव म्हण

वॉशिंग मशिनच्या ड्रायरमध्ये अडकला चिमुकला
रूग्णांचा नव्हे, नागरिकांचा डेटा सेल! 
भाजपने विरोधी मतांचे विभाजन करून हा विजय मिळविला : ना. जयंत पाटील

नाशिक प्रतिनिधी – इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक शाखेचे अध्यक्ष डॉ. विशाल गुंजाळ यांची इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य येथे सहसचिव म्हणुन 2023-24 साली नियुक्ति झाली आहे. नुकत्याच अमरावती येथे झालेल्या वार्षिक संमेलनामध्ये डॉ. गुंजाळ बिनविरोध निवडून आलेत.  बर्‍याच वर्षानंतर नाशिक  मधून राज्यस्तरावर पद भूषवणारे डॉ. गुंजाळ हे नाशिक आय एम ए चे सर्वात तरुण अध्यक्ष आहेत.  डॉ.  गुंजाळ हे स्पाइन स्पेशलिस्ट असून नाशिक पेन केअर सेंटर चे  संचालक डायरेक्टर आहेत तसेच  के. टी. एच. एम. महाविद्यालयाचे माजी विभागप्रमुख डॉ.बाळासाहेब गुंजाळ यांचे चिरंजीव आहेत. विविध प्रकारच्या वेदना तसेच मणक्याचे आजार दूर करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून त्यांनी अनेक रुग्णांवर उपचार केले असून अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी पेन मॅनेजमेंट या विषयावर व्याख्याने दिली आहेत. त्यांच्या या  यशाबद्दल त्यांना इंडियन मेडिकल असोसिएशन तसेच मराठा विद्याप्रसारक समाज व नाशिक डिस्ट्रिक्ट क्रिकेट एसोसिएशन, सार्वजानिक वाचनालय चे पदाधिकारी तसेच मित्रवर्ग यांच्याकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत.

COMMENTS