Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पंजाबमध्ये डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याची विटबंना

अमृतसर : देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्सव सुरू असतांना संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आणि संविधानाचा जागर सुरू असतांना

न्यायालयाच्या आदेशाचा अवमान; बिल्डरसह डेव्हलपरना 3 वर्ष कारावासासह दंडाची शिक्षा
Mumbai : रेल्वे स्टेशनवर महिलेचा गळा चिरण्याचा प्रयत्न| LOKNews24
 सिन्नर- शिर्डी महामार्गावरील अपघातात जखमींची मंत्री दादा भुसेंकडून पाहणी

अमृतसर : देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्सव सुरू असतांना संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आणि संविधानाचा जागर सुरू असतांनाच दुसरीकडे रविवारी पंजाबमधील अमृतसरमधे एका तरूणाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तोडत त्याची विटंबना केली. पुतळा तोडण्यासाठी हा तरूण पुष्पहार अर्पण करण्यासाठी ठेवलेल्या शिडीवर तढला, त्यानंतर त्याने पुतळ्यावर हातोड्याने वार केले, त्यामुळे पुतळा तुटला. पुतळ्याजवळ ठेवलेल्या संविधानाच्या प्रतिमेचीही तोडफोड करण्याचा प्रयत्न केला, ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे, याप्रकरणी देशभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकारानंतर लोकांनी तरुणाला पकडून बेदम मारहाण केली आणि पोलिसांना माहिती दिली. पोलिस ठाण्यापासून सुमारे दीडशे मीटर अंतरावर असलेल्या हेरिटेज स्ट्रीटवर ही घटना घडली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या लोकांनी हॉलगेट चौक बंद करून आंदोलन सुरू केले.

COMMENTS