Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. अ‍ॅड. राजेंद्र सारडा यांच्या पाठीवर बीडच्या संगीत रसिकाकडून कौतूकाची थाप

बीड प्रतिनिधी - गायक डाँ. राजेंद्र सारडा एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व असून सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य  यासह विविध क्षेत्रात  उल्लेखनीय कामगिरी करीत अ

लातुरात 78 बँक कर्मचार्‍यांनी केले रक्तदान
लखीमपूर-खिरी प्रकरणाच्या साक्षीदारांना सुरक्षा पुरवा- सर्वोच्च न्यायालय
रेस्टॉरंटमधील माऊथ फ्रेशनरमुळे ५ जणांना रक्ताच्या उलट्या

बीड प्रतिनिधी – गायक डाँ. राजेंद्र सारडा एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व असून सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य  यासह विविध क्षेत्रात  उल्लेखनीय कामगिरी करीत असताना त्यांना लहानपणापासूनच घरातूनच गायन, संगीत या विषयाचे बाळकडू मिळाले. त्यांना बालवयापासून मराठी, हिंदी भक्तीगीते, भावगीते, जुन्या नव्या जमान्यातील चित्रपटातील गीते गुणगुणण्याची आवड असून कालांतराने ही कला अधिकच बहरत गेली.  त्यांच्या कंठात सरस्वतीचा वास असून पाहता पाहता त्यांचे नावे  21 जुलै 2023 पर्यत जवळपास 6251 गीतांची नोंद झाली आहे. स्टारमेकर पवर थोर गायक मुकेश, मोहम्मद रफी, मन्ना डे यासह ख्यातनाम संगीत गायकांच्या 6251 विविध हिंदी गीतावर त्यांनी एक रेकॉर्ड स्थापित केला आहे.
शुक्रवार दि.21 रोजी माहेश्वरी प्रगती मंडळ बीड व दीपमाळ योगा मित्र मंडळ बीड यांच्या संयुक्त विद्यमाने रॉकस्टार गायक डॉ.अँड. योगप्रशिक्षक राजेंद्र सारडा यांच्या सुमधुर गायन संध्या कार्यक्रमाचे वृंदावन गार्डन सभागृहात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदना, सरस्वती पूजन, दिपप्रज्वलन प्रा. काटे साहेब, सी.ए. गोपाल कासट, डॉ. काकडे, सुदर्शन धुतेकर, विष्णुदास बियाणी, डॉ. राजेंद्र सारडा, उबाळे काका यांच्या हस्ते करण्यात आले.  डॉ. साहेब हाडाचे कलावंत असून एका मानसात किती तरी कला दडलेल्या असतात त्याचे डॉ. राजेंद्र सारडा हे उत्तम उदाहरण आहे. ते मुकेशजी यांच्या सुंदर आवाजात विविध नवे जुने गीते चांगल्या पद्धतीने सादर करू शकतात. मागील काळात त्यांनी स्टारमेकर ग्रुप जॉईन केला रॉकस्टार अँपवर त्यांनी जवळपास 6251 गीते पूर्ण केली असा रेकॉर्ड करणारे ते जिल्ह्यातील एकमेव गायक आहेत. माहेश्वरी प्रगती मंडळाने रेकॉर्ड पूर्ण झाल्याबद्दल त्यांचा मागीलवर्षी सत्कारही केला. पुढील काळात ते जिल्ह्यातच नव्हे तर मराठवाड्यात बीड शहराचे नाव उज्वल करतील यात शंकाच नाही त्यामुळेच ते गायन क्षेत्रातील कोहिनूर हिरा ही उपाधी त्यांना तंतोतंत लागू पडते. त्यांची तपश्चर्या आणि संगीताची आवड हीच त्यांची खरी ऊर्जा आहे. या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना डॉ. राजेंद्र सारडा म्हणाले की वैद्यकीय क्षेत्रा बरोबरच कायदा विषयक सल्ला आणि योग साधनेतून संगीतकला जोपासण्याचे काम मी आजपर्यंत केले. या कार्यात मला अनेकांचे सहकार्य लाभले असून पुढील काळात ही योग साधना आणि संगीत सेवेतून माझ्याबरोबरच इतरांनाही आनंद प्राप्त करून देण्यासाठी मी अधिक प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमात गायक डॉ. राजेंद्र सारडा यांनी विठु माऊलीला साकडे घालून जुन्या जमान्यातील गाजलेली हिंदी गिते तीन तास अखंड सादर करून उपस्थितांच्या टाळ्या मिळविल्या. या कार्यक्रमासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष सुभाषचंद्रजी सारडा, राजेंद्र मुनोत, डॉ, पाखरे, माहेश्वरी प्रगती मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर जेथलिया, सचिव बद्रीनाथ मानधने, सि.ए.गोपाल कासट, सुरज लाहोटी, डॉ.सि.ए.गायकवाड, डॉ.मोगले साहेब, ॅड. दामोदरराव राऊत, राजेश मुंदडा, अँड. विजयकुमार कासट, डॉ. शिवप्रसाद चरखा, गंगाबिशन करवा,  विष्णुदास तापडिया, प्रदीप चितलांगे, सुरेंद्र कासट, हरीश मालू , गोविंद लाहोटी, ईश्वर चरखा, भगीरथ चरखा, संतोष टवाणी, राजु बियाणी, संजय मु्ंदडा, डॉ.बी.जी.झंवर, डॉ. शृंगारपुरे, गणेश कासट, राम मानधने, आदित्य सारडा, जगदीश सिकची,  प्रमोद मनियार, बालाप्रसाद जाजू, इंजि. दगडूलालजी बंग साहेब, जवाहरलाल सारडा, शिवशंकरजी  कोरे, कैवाडे, अमर डागा, शरद सारडा, ईश्वर चरखा, दिलीप सारडा आदींसह माहेश्वरी प्रगती मंडळ व दीप योगा मित्र मंडळ, जिओ गीता परिवारातील पदाधिकारी, सदस्य, सारडा परिवार, स्नेहीजन, मित्रपरिवार, महिला, पुरुष रसिक श्नोत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमात माहेश्वरी प्रगती मंडळ बीड व दीपमाळ योगा मित्र मंडळ, जियो गीता परिवार, डॉक्टर कॉलनी परिवार, सद्भावना परिवारावतीने डॉ.अँड.योगप्रशिक्षक, राँकस्टार गायक राजेंद्र सारडा यांचा संपत्नीक सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास लाईट व्यवस्था राजेश शिंदे, साऊंड सिस्टिम व्यवस्था सतीश पगारिया व रवि बियाणी यांनी केली तर या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन  सुधिर देशमुख यांनी केले तर उपस्थितांचे आभार विष्णुदास बियाणी यांनी मानले.

COMMENTS