माजलगाव । प्रतिनिधीयेथील सिद्धेश्वर महाविद्यालयातील प्रा. लक्ष्मीकांत सोन्नर यांचे सुपुत्र डॉ. आदित्य प्रतिभा लक्ष्मीकांत सोन्नर यांनी वैद्यकीय क्

माजलगाव । प्रतिनिधी
येथील सिद्धेश्वर महाविद्यालयातील प्रा. लक्ष्मीकांत सोन्नर यांचे सुपुत्र डॉ. आदित्य प्रतिभा लक्ष्मीकांत सोन्नर यांनी वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत महत्त्वपूर्ण व कठीण समजल्या जाणार्या एमडी (स्किन) परीक्षेत प्रथम श्रेणीत यश संपादन केले आहे.
डॉ. आदित्य यांचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण श्री सिद्धेश्वर शैक्षणिक संकुल, माजलगाव येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी लातूर येथील राजर्षी शाहू महाविद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (घाटी), छत्रपती संभाजीनगर येथे एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. पुढे मायमर हॉस्पिटल, तळेगाव दाभाडे (पुणे) येथे त्यांनी एमडी (स्किन) या कठीण परीक्षेत घवघवीत यश मिळवत उज्वल कारकीर्दीची गवसणी घातली आहे. डॉ. आदित्य यांचा धाकटा भाऊ डॉ. अजिंक्य सोन्नर हा सध्या अमरावती येथे एमबीबीएसच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत आहे. या यशाबद्दल भाशिप्र संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र आलुरकर, कार्यवाह हेमंत वैद्य, प्रा. चंद्रकांत मुळे, प्रकाश दुगड, अमरनाथ खुर्पे, सुरेंद्र रेदासनी, अॅड. विश्वास जोशी, अभय कोकड, प्रशांत भानप, पवन मानधने, प्राचार्य मुकुंद देवर्षी, मुख्याध्यापक संतोष लिंबकर, सुमती भारती, अनंत रुद्रवार, गोविंद बजाज, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष तुकाराम येवले, उमेश मोगरेकर, बबनराव सरवदे, सुधीर नागापुरे, कमलेश जाब्रस, दिनकर शिंदे, दत्ता येवले आदींनी डॉ. आदित्य यांचे अभिनंदन केले आहे.

COMMENTS